बुधवारी (१३ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज असा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सचा कर्धणार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. परंतु त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद मात्र स्वतःच्या नावावर केली. रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये वैयक्तिक १०००० धावा नावावर केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय बनला.
रोहित शर्माने पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात १७ चेंडू खेळले आणि २७ धावा केल्या. रोहितच्या या छोट्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूवर त्याने षटकार मारला आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःच्या १०००० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने विकेट गमावली आणि तंबूत परतला. यापूर्वी विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये १०००० धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) आता ही कामगिरी करणारा दुसरा भारतीय बनला आहे. रोहितने ३६२ डावांमध्ये या धावा केल्या आहेत, तर दुसरीकडे विराटने अवघ्या २९९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
जागतिक क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आता १०००० टी-२० धावा करणारा ७वा फलंदाज बनला आहे. सर्वाधिक टी-२० धावा करणाऱ्यांमध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलच्या नावावर १४५६२ टी-२० धावा आहेत. ११६९८ टी-२० धावांसह पाकिस्तानचा शोएब मलिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रामांकवर ११४७४ धावांसह कायरन पोलार्ड आहे. त्यानंतर १०४९९ धावांसह ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच आहे. पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याच्या नावावर १०३७९ धावा आहेत. सहाव्या क्रमांकावर १०३७३ धावांसह ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आहे. आता रोहित या यादीत नव्याने सहभागी झाला आहे. १०००३ धावांसह रोहित ७व्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, पंजाब किंग्जने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या होत्या. पंजाबसाठी सलामीवीर शिखर धवन (७०) आणि मयंक अगरवाल (५२) यांनी अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचे खेळाडू जेव्हा मैदानात आले, तेव्हा रोहित आणि इशान किशन ही सलामीवीर जोडी अपयशी ठरली. रोहितने २८, तर इशान अवघ्या ३ धावा करून बाद झाला. युवा डेविड ब्रेविस (४९) आणि तिलक वर्माचे प्रदर्शन मात्र कौतुकास पात्र होते. रोहितला चालू आयपीएल हंगामात अजूनपर्यंत एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात मुंबईला पंजाबकडून १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा गुणतालिकेत तळाशी राहिली.
सर्वाधिक टी-२० धावा करणारे फलंदाज
१४५६२ धावा- ख्रिस गेल
११६९८ धावा- शोएब मलिक
११४७४ धावा- कायरन पोलार्ड
१०४९९ धावा- ऍरॉन फिंच
१०३७९ धावा- विराट कोहली
१०३७३ धावा- डेविड वॉर्नर
१०००३ धावा- रोहित शर्मा*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईविरुद्ध ७० धावांची सलामी देणारा ‘गब्बर’ ठरला ‘या’ मोठ्या विक्रमाचा मानकरी, रैनालाही पछाडले
शंभराव्या आयपीएल डावात मयंकची शानदार फिफ्टी; कर्णधार म्हणून पहिल्यांदाच केला खास कारनामा
MI vs PBKS: मुंबईचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, विजयाचं खातं उघडण्याचा असेल प्रयत्न