---Advertisement---

भारताच्या ‘जावया’ची आयपीएलमध्ये थाटात एन्ट्री; मुंबईच्या मॅचविनर पठ्ठ्याला चित्त्याच्या चपळाईने केले रनआऊट

On: रविवार, एप्रिल 10, 2022 12:04 AM
Glenn-Maxwell
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या १८व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन बलाढ्य संघ आमने- सामने होते. आरसीबीचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसाठी हा त्याचा चालू हंगामातील पहिला सामना होता. हंगामातील पहिल्याच सामन्यात मॅक्सवेलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. सामन्यात मॅक्सवेलने स्वतःची एक वेगळी झाप सोडली.

ऑस्ट्रेलिया दिग्गज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यासाठी उपलब्ध राहिला. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माला मॅक्सवेलमुळे शून्य धावांवर विकेट गमवावी लागली. मॅक्सवेलने ज्या चपळाईने तिलक वर्माला धावबाद केले, ते पाहून उपस्थित सर्वजण आणि सामना पाहणारा प्रत्येक चाहता हैराण झाला. ही घटना मुंबईच्या डावात १०व्या षटकात घडली. आकाश दीपने याच षटकात सलामीवीर ईशान किशनची विकेट घेतली होती आणि युवा तिलक वर्मा (Tilak Varma) फलंदाजीसाठी आला होता.

षटकातील शेवटच्या चेंडूवर वर्माने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या समोरच होता. वर्मा धाव घेण्यासाठी पळताच क्षेत्ररक्षक मॅक्सवेल त्याहीपेक्षा वेगाने धावत सुटला. अवघ्या तीन सेकंदाच्या कालावधीत मॅक्सवेलने एक जबरदस्त डाईव्ह मारत वर्माला धावबाद केले. यावेळी मॅक्सवेलला फक्त एक स्टंप दिसत होता, पण त्याने कसलीही चूक न करता चेंडू योग्य निशाण्यावर मारला. यावेळी त्याने स्वतःचा संपूर्ण अनुभव पणाला लावल्याचे दिसले. त्याचे हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन पाहून प्रत्येकाच्या तोंडून त्याच्यासाठी कोही कौतुकाचे शब्द नक्कीच निघत आहेत.

https://twitter.com/tanyadiors/status/1512808914835804161?s=20&t=f-8JCKcrqg_BDwrKde6teg

सामन्याचा विचार केला, तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plessis) नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचे फलंदाज लागोपाठ विकेट्स मगावत होते. ६व्या विकेटनंतर सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनादकट यांनी मुंबईचा डाव संभाळला. सूर्यकुमारच्या नाबाद ६८ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या.

आरसीबीसाठी श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच, दीप दासच्या वाट्याला एक विकेट आली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

“राहुल तेवतियाच्या मूर्तीची पंजाब संघाने पुजा केली पाहिजे”

पहिल्या चारही पेपरात ‘कर्णधार’ जडेजा ‘नापास’! अपयशी विद्यार्थ्यांच्या ‘त्या’ यादीत थेट दुसऱ्या स्थानावर

अखेर हैदराबादचा ‘सनराईज’, चेन्नईवर ८ विकेट्सने चारीमुंड्या चित; अभिषेक शर्मा विजयाचा शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---