मंगळवारी (१७ मे) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आमना सामना झाला. सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ३ धावांनी हा सामना जिंकला. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर वानखडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्यासाठी आली होती. परंतु शेवटच्या षटकांमध्ये असे काही घडले, ज्यामुळे सारा मोठ्याने ओरडल्याचे पाहायला मिळाले. तिचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यापूर्वीही सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) चालू हंगामात मैदानात आल्याचे पाहिले गेले आहे. परंतु या सामन्यात तिची चर्चा अधिक झाली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने १९४ धावांचे लक्ष्य उभे केले होते. प्रत्युत्तरात मुंबईच्या डावातील शेवटच्या षटकांमध्ये साराला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती मोठ्याने ओरडल्याचे पाहायला मिळाले.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली. मुंबईने पहिली विकेट रोहितच्या रूपात संघाच्या ९५ धावांवर गमावली. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मात्र लवकर बाद झाले. अशात मुंबईचा डाव सांभाळला तो टिम डेविडने. सिंगापूरच्या या खेळाडूने अवघ्या १८ चेंडूत ४६ धावा ठोकल्या, पण तो संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1526620559211044865?s=20&t=0LhY5YcEZ4iQ7Tjs5dk2uw
https://twitter.com/india_fantasy/status/1526620645995737088?s=20&t=OJAjSQMKoLMhlrwG2EVU8Q
मुंबईच्या डावातील १८ वे षटक वेगवान गोलंदाज टी नटराजन घेऊन आला. टिम डेविडने नटराजनला चांगलाच चोप दिला. त्याने या षटकात चार षटकार मारले आणि एकूण २६ धावा मिळवल्या. परंतु षटकातील शेवटच्या चेंडुवर हैदराबाद संघाने हिशोब बरोबर केला. शेवटच्या चेंडुवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेला डेविड धावबाद झाला. नॉन स्ट्राईक आणि स्ट्राईकवरून फलंदाजात ताळमेळ कमी पडल्यामुळे डेविडला विकेट गमवावी लागली. डेविडने जर विकेट गमावली नसती, तर मुंबईने शक्यतो हा सामना जिंकला असता.
सारा तेंडुलकरला या विकेटचे महत्व चांगले माहीत असल्यामुळे ती हैराण होती. तिचे स्टेडियमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईला मर्यादित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यांना ३ धावांनी पराभव स्वीकारला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
MIvsSRH: पुन्हा एकदा मावळली मुंबईच्या विजयाची आशा! ‘तो’ रनआऊट ठरला टर्निंग पाँईट
IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’