आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. शनिवारी (१२ मार्च) आयपीएल फ्रँचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला नवीन कर्णधार मिळाला. मागच्या हंगामात घोषित केल्यानुसार विराट कोहली याने संघाचे नेतृत्व सोडले आहे आणि फाफ डू प्लेसिस संघाचा नवीन कर्णधार बनला आहे. आरसीबीचे डायरेक्टर हेसनने डू प्लेसिसला कर्णधार बनवण्यामागचे प्रमुख कारण स्पष्ट केले आहे.
आरसीबीचे (RCB) डायरेक्टर माइक हेसन (Mike Hesson) यांना विचारले गेले की, संघाने कर्णधारपदाचा विचार करून डू प्लेसिस (Faf du Plessis) याला खरेदी केले होते का ? यावर उत्तर देताना हेसन म्हणाले की, “हा एक मिश्रित भाग होता. तो एक खूप चांगला खेळाडू आहे. जेव्हा तुम्हाला ठरवायचे असते की, कर्णधाराच्या रूपात सर्वात उपयुक्त पर्याय कोणता आहे, तेव्हा तुम्ही हा विचार करू शकत नाही की, तो भारतीय खेळाडू आहे की, विदेशी.”
“जाहीर आहे आमच्याकडे (ग्लेन) मॅक्सवेल आणि विराटकडे (Virat Kohli) कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे आणि आम्ही त्यांना कायम ठेवले आहे. आम्हाला वाटले की, नेतृत्व गटामध्ये आम्ही विस्तार करू इच्छितो आणि हर्षल पटेल, ज्याला आम्ही पुन्हा खरेदी करू इच्छित होतो. तर हे आमच्या नेतृत्वाला पुढे घेऊन जाण्याविषयी होते. फाफ लिस्टमध्ये सर्वात वरती होता, ज्यांना आम्ही विकत घेऊ इच्छित होतो. मला माहितीय की, तो किती सन्मानित आणि चतूर आहे. तो विराटची निवड आहे,” असे हेसनने पुढे बोलताना सांगितले. माइक हेसनच्या मते आरसीबीकडे विराट, मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक असे नेतृत्व गटासाठी चांगले पर्याय आहेत.
दरम्यान, फाफ डू प्लेसिस आयपीएल २०२१ पर्यंत एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) महत्वाचा खेळाडू होता. परंतु आगामी हंगामापूर्वी सीएसकेने त्याला रिलिज केले आणि मेगा लिलावात आरसीबीने त्याला खरेदी केले. आरसीबीने डू प्लेसिस संघात घेण्यासाठी तब्बल ७ कोटी खर्च केले. तसेच दिनेश कार्तिकसाठी ५.५ कोटी खर्च केले. मेगा लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार होता.
महत्वाच्या बातम्या –
भारताने पराभवाची धूळ चारलेल्या वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का, आयसीसीने ठोठावला मोठा दंड
दुसऱ्या कसोटीत विराटने केले असे काही की, चाहत्यांनी दिले त्याच्या अन् डिविलियर्सच्या नावाचे नारे
ऑस्ट्रेलियन महिलांची शंभरी! केली पुरुष संघांनाही न जमलेली ‘अद्वितीय’ कामगिरी






