---Advertisement---

धोनीने विराटप्रमाणेच सोडले संघाचे कर्णधारपद, पाहा दोघांच्या निर्णयात काय आहे साम्य

On: शुक्रवार, मार्च 25, 2022 4:53 PM
MS-Dhoni
---Advertisement---

भारताचा महान क्रिकेटपटू एमएस धोनी याने गुरुवारी (२४ मार्च) अचानकपणे त्याची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. सीएसके आणि केकेआरमध्ये २६ मार्च रोजी आयपीएल २०२२ चा पहिला सामना खेळला जाणार आहे. आता या पहिल्या सामन्यापासून रवींद्र जडेजा सीएसकेचे नेतृत्व करणार आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. धोनीने या निर्णयाची घोषणा अचानक घेतला असली, तरी त्याआधीच धोनीने या निर्णयाविषयी विचार केला आहे.

धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये त्याने विराट कोहलीच्या निर्णयाचे अनुकरण केल्याचे दिसत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने अचानक सोशल मीडियावर पोस्ट करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु, यावेळी सीएसकेचे कर्णधारपद सोडताना त्याने फ्रेंचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशी आधीच चर्चा केली होती. सीईओंसोबत चर्चा झाल्यानंतर धोनीने त्याच्या निर्णयाची माहिती इतरांना दिली.

इनसाइड स्पोर्ट्ससोबत बोलताना विश्वनाथन म्हणाले की, त्यानी यावर अभ्यास केल्यानंतर संघाच्या बैठकीत त्याच्या निर्णयाची घोषणा केली, पण तो आधीपासूनच याविषयी विचार करत होता. धोनीच्या मते रवींद्र जडेजा संघाची कमान सांभाळण्यासाठी तयार आहे आणि नेतृत्वाची भूमिका साकारण्यासाठी तयार होता.

सीएसकेच्या सूत्रांनी सांगितले की, जेव्हा धोनीने त्यांच्या निर्णयाची माहिती सीईओंंना दिली, तेव्हा ते देखील हैराण झाले. दुपारच्या वेळी धोनी आणि श्रीनिवासन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आणि धोनीने त्यांना स्वतःचा निर्णय सांगितला. माहितीनुसार श्रीनिवासन सुरुवातील हैराण झाले होते, पण फोन संपेपर्यंत त्यांना धोनीचा निर्णय पटला होता. दोघांमध्ये साधारण १० मिनिटे चर्चा झाली. फोनवरील चर्चेनंतर धोनीने संघाच्या बैठकीत त्याच्या निर्णयाची माहिती संपूर्ण संघाला दिली. याच बैठकीत जडेजाला सीएसकेचा नवीन कर्णधार निवडले गेले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. यानंतर विराटनेही कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. विराटने त्यावेळी या निर्णयाची घोषणा करण्यापूर्वी संघाच्या बैठकीत याची माहिती संघातील सहकाऱ्यांना दिली होती. आता धोनीनेही विराटचा मार्ग स्विकारल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२२च्या उद्घाटन सामन्यात भिडणार सीएसके अन् केकेआर, पाहा उभय संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

‘कर्णधार’ धोनी युगाची अखेर! विराट, सेहवाग ते आयपीएल संघ, क्रिकेटविश्वातून अशा उमटल्यात प्रतिक्रिया

अगग! बड्डेला ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा फक्त डक नव्हे तर डकचा नकोसा विश्वविक्रम, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---