आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला ७ विकेट्सने पराभूत केले. गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या. सीएसकेला जरी या सामन्यात पराभव मिळाला असला, तरी एमएस धोनीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. भारताला इतिहासातील दुसरा विश्वचषक मिळवून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि धोनीची जोडी चाहत्यांनी मोठ्या काळानंतर एकत्र पाहिली.
भारताने २०११ साली इतिहासातील दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिकंला होता. त्यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) संघाचा कर्णधार होता, तर गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी विश्वचषक विजेती ही जोडी चांगलीच नावारूपाला आली होती. कर्स्टन आता लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक आहेत आणि धोनी सीएसकेचा कर्णधार आहे. उभय संघातील रविवारी (१५ मे) पार पडलेल्या सामन्यात दिग्गजांची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच ते व्हायरल होण्यासाठी अवघे काही मिनिट पुरेसे पडले.
सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून या दोघांचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या २०११ विश्वचषकातील आठवणींना उजाळा मिळाला आहे. व्हिडिओत कर्स्टन धोनीसोबत चर्चा करत आहेत आणि त्यांनी धोनीच्या खांद्यावर हात देखील ठेवला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे. धोनीही एखाद्या जुन्या मित्राला भेटल्याप्रमाणे कर्स्टनसोबत बोलताना दिसत आहे. या दोघांमधील हे जवळचे संबंध पाहून चाहत्यांची मने सुखावली आहेत.
https://www.instagram.com/tv/CdnC3XFl-DC/?igshid=YmMyMTA2M2Y=
दरम्यान, उभय संघातील हा सामना संपल्यानंतर कर्स्टनने रिद्धिमान साहाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “जाहीर आहे की, आम्ही त्याच्या प्रदर्शनामुळे खूप प्रभावित आहोत. तो संघात असणे चांगली गोष्ट आहे. तो एक प्रेफेशनल क्रिकेटपटू आहे. आयपीएल आणि क्रिकेटच्या सर्व प्रकारांचा त्याला चांगला आनुभव आहे. साहाला त्याचा खेळ चांगल्याप्रकारे माहिती आहे आणि पॉवरप्लेमध्ये तो खरोखर चांगले प्रदर्शन करतो. आमच्यासाठी तो नेमहीच एक महत्वाचा खेळाडू राहिला आहे.”
दरम्यान, भारतीय संघाचा दिग्गज कसोटी खेळाडू रिद्धिमान साहा आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात ५७ चेंडूत ६७ धावा केल्या आणि यष्टीपाठी दोन झेल देखील पकडले. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
फक्त १० सामन्यांत चहल मोडणार विराटचा ९७३ आयपीएल धावांचा विक्रम? पाहा नक्की काय आहे प्रकरण
‘सीएसके मॅनेजमेंटच्या वागणूकीमुळे नाराज आणि दुःखावलोय’, रविंद्र जडेजा; चेन्नई-जड्डू यांचे ब्रेकअप?
एकदम कडक! अँडरसनने जबरदस्त स्विंग करत उडवल्या जो रुटच्या दोन दांड्या, Video व्हायरल