इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) च्या हंगामाचे बिगूल वाजले आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाची सुरुवात होणार असून २९ मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल. यंदाच्या हंगामात ८ ऐवजी १० संघ सहभागी होणार असल्याने आयपीएलचा रोमांच अजून वाढणार आहे. तत्पूर्वी आयपीएलचे अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स (Star Sports) ने आयपीएल २०२२ चा नवा प्रोमो (IPL 2022 New Promo) जाहीर केला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) चा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) या प्रोमोमध्ये दिसतो आहे. मात्र या प्रोमोमध्ये तो नव्या अवतारात (MS Dhoni New Look) दिसत आहे. यापूर्वीही स्टार स्पोर्ट्सने आयपीएलचा प्रोमो रिलीज केला होता.
आयपीएलच्या नव्या प्रोमोत धोनी आजोबा बनला आहे. प्रोमोच्या व्हिडिओत दिसले की, धोनी एका कुटुंबासोबत आयपीएल सामना पाहातो आहे. टीव्हीवर धोनीच चेन्नई संघाची जर्सी घालून फलंदाजी करत असतो. इतक्यात टेलिफोनची रिंग वाजते. यावेळी धोनीच्या बाजूचा मुलगा उठून फोन उचलण्याच्या विचारात असतो. परंतु धोनी त्याला थांबवतो आणि टेलिफोनजवळ उभा असलेल्या महिलेला फोन उचलण्याचा इशारा करतो.
फोन करणारा व्यक्ती पापाजी अर्थात धोनीशी (MS Dhoni’s Papaji Look) बोलण्याची विनंती करतो. यावर धोनी इशारा करतो की, त्यांना सांग पापाजी आऊट झाले आहेत. त्यानंतर ती महिला मोठमोठ्याने रडण्याचा अभिनय करत पापाजी आऊट झाले आहेत असे म्हणते आणि फोन ठेवते. त्यानंतर ती पापाजींना विचारते की, स्ट्राईकवर कोण आहे. यावर धोनी म्हणतो की, माही आहे. आणि सगळेजण सेलिब्रेशन करू लागतात.
To all other plans once match starts – we will miss you! ????
Bahanebaazi ki nahi hogi koi limit – #TATAIPL mein #YehAbNormalHai! ????
Keep your excuses ready for when the action starts on March 26, LIVE on Star Sports & Disney+Hotstar. pic.twitter.com/diDEBGnbuh
— Star Sports (@StarSportsIndia) March 6, 2022
स्टार स्पोर्ट्सने या प्रोमोचा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘बहानेबाजीची नसेल कोणतीही लिमिट’, असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांना धोनीचा नवा लूक आणि आयपीएलचा नवा प्रोमो फार आवडला आहे. ते व्हिडिओखाली प्रतिक्रिया देत व्यक्त होत आहेत.
Thala Dhoni’s cooking up a storm and wants YOU with him – can you guess what he’s pointing to? ????#DhonisNewLook pic.twitter.com/hlVqBsVRxu
— Star Sports (@StarSportsIndia) February 27, 2022
पहिल्या प्रोमोत धोनी होता बस ड्राईव्हरच्या अवतारात
यापूर्वीही स्टार स्पोर्ट्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये थाला नावाने आयपीएलप्रेमींमध्ये प्रसिद्ध असलेला धोनी बस ड्राईव्हरच्या अवतारात दिसत आहे. अंगावर बस ड्राईव्हरसारखा ड्रेस त्याने परिधान केला होता. त्याने या ड्रेससोबत गळ्यात रूमालही अडकवला आहे, ज्याच्या एका बाजूला मेडल लटकवलेले दिसत होते. यासोबतच त्याचे केस वाढलेले दिसत आहेत आणि मोठ्या झुपकेदार मिशाही आहेत. तसेच तो हातात लाउड स्पिकर घेऊन उभा असल्याचेही दिसत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२: सीएसके खेळणार हंगामातील पहिला सामना, ‘असे’ आहे धोनीच्या टीमचे संपूर्ण वेळापत्रक
भारताविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंकेला मोठे नुकसान, गमावले WTC गुणतालिकेतील पहिले स्थान
ताक धिना धिन धा! श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करणाऱ्या शमीच्या डोक्यावर अश्विनने वाजवला तबला- Video






