---Advertisement---

भारताविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंकेला मोठे नुकसान, गमावले WTC गुणतालिकेतील पहिले स्थान

On: सोमवार, मार्च 7, 2022 12:19 PM
Sri-Lanka-Team
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) झाला. यजमान भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने (India’s Big Win Over Sri Lanka) हा सामना जिंकला. हा सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा (ICC Test Championship 2021-23) भाग होता. भारताने या महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवत त्यांची गुणतालिकेतील स्थिती (ICC Test Championship 2021-23 Point Table) मजबूत केली आहे. तर श्रीलंकेला या मानहानिकारक पराभवानंतर मोठे नुकसान झाले आहे. 

भारतीय संघाला फायदा
श्रीलंकेवरील विजयानंतर भारतीय संघाच्या गुणतालिकेतील स्थानामध्ये सुधारणा झालेली नाही. परंतु त्यांच्या परसेंटेंज ऑफ पाँईट्स (पीसीटी) मध्ये चांगली प्रगती झाली आहे. भारतीय संघाची पीसीटी आता ५४.१६ इतकी झाली आहे. तसेच त्यांच्या खात्यात आता ६५ गुण असून ते गुणातालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहेत. भारताने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत ११ कसोटी सामने खेळले असून त्यातील ५ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत. तर २ सामने अनिर्णीत राहिले आहेत. तसेच इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्याचा निकाल लागणे अजून बाकी आहे.

श्रीलंकेच्या संघाचे मोठे नुकसान
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला या पराभवानंतर मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी त्यांचे गुणतालिकेतील पहिले स्थान गमावले असून ते तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. यापूर्वी श्रीलंकेचा संघ १०० पीसीटीसह गुणतालिकेत प्रथमस्थानी कायम होता. परंतु भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर त्यांच्या पीसीटीत नुकसान झाले आहे. श्रीलंकेच्या संघाची पीसीटी आता ६६.६६ वर आली आहे. श्रीलंकेचा हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील तिसरा सामना होता. त्यांनी या ३ पैकी २ सामने जिंकले आहेत तर १ गमावला आहे. त्यांच्या खात्यात सध्या २४ गुण आहेत.

इतर संघांची अशी आहे परिस्थिती
श्रीलंकेच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघाला मात्र जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाची पीसीटी आता ८६.६६ झाली असून ते अव्वलस्थानी पोहोचले आहेत. तर पाकिस्तानचा संघ ७५ पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ६० पीसीटीसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच भारतानंतर न्यूझीलंडचा संघ ३८.८८ च्या पीसीटीसह सहाव्या व बांगलादेशचा संघ २५ पीसीटीसह सातव्या व वेस्ट इंडिजचा संघ नवव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ मात्र सर्वात खालच्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ताक धिना धिन धा! श्रीलंकेच्या कर्णधाराला बाद करणाऱ्या शमीच्या डोक्यावर अश्विनने वाजवला तबला- Video

‘तो सर्व सोन्यात बदलतोय’, मास्टर-ब्लास्टरनेही घेतली जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीची दखल

कर्णधार रोहित शर्माने खांद्यावर घेतली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘विजयापेक्षा संघात बेंच स्ट्रेंथ…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---