आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ, अशी ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सला चालू हंगामात मात्र अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाहीये. फ्रँचायझीचे प्रदर्शन खराब असले, तरी त्यांचा मध्यक्रमातील युवा फलंदाज तिलक वर्मा पहिल्या सामन्यापासून चांगले प्रदर्शन करत आला आहे. आता याच युवा फलंदाजाने सहकारी खेळाडूंसोबत एक प्रँक केला आहे. मुंबई इंडियन्सने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईने हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि गुणतालिकेत त्यांचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या सामन्यात विजय मिळवला असला, तरीही त्यांचा संघ आता प्लेऑफ फेरीत पोहोचू शकणार नाही. अशातच त्यांचा १९ वर्षीय युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varme) याने सहकारी खेळाडू डेवाल्ड ब्रेविस, टीम डेविड आणि रिले मेरेडिथ यांच्यासोबत हा प्रँक केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तिलक वर्माने हा प्रँक करण्यासाठी चांगलीच विचारपूर्वक रणनीती तयार केली होती. त्याने ओरियोच्या बिस्किटांमधील क्रिम काढून टाकली आणि त्याठिकाणी टुथपेस्ट लावली. क्रिमचा आणि टुथपेस्टचा रंघ पांढराच असल्यामुळे बघितल्यानंतर दोन्हीतील फरक समजणे कठीण आहे. तिलक नंतर या खेळाडूंच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. पुढे तो त्यांना हे बिस्किट देतो आणि खेळाडू देखील ते बिस्किट खातात. सुरुवातीला खेळाडूंना फरक जाणवत नाही, पण काही वेळानंतर त्यांनीही काहीतरी गडबड असल्याचे ओळखले. त्यानंतर तिलक वर्मा त्यांच्यासमोर मोठमोठ्याने हसताना दिसतो.
That 'Ye toh alag taste kar raha hai' face 🤣
Tilak got 'em all fooled with this biscuit prank 😉🍪#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @TilakV9 @timdavid8 @BrevisDewald MI TV pic.twitter.com/kEVf8FxnVv
— Mumbai Indians (@mipaltan) May 3, 2022
मुळचा हैदराबादचा असलेल्या तिलक वर्माला आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने केले. संघातील इतर खेळाडू अपयशी ठरत असताना तिलक मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात मुंबईने १.७० कोटी रुपयांमध्ये त्याला खरेदी केले. चालू हंगामात त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ४३.८५च्या सरासरीने ३०७ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सव्यतिरिक्त प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दम असणारे तीन संघ, कारणही आहे तितकंच खास
वेस्ट इंडिज संघाला मिळाला नवा कर्णधार! आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या खेळाडूच्या हाती विंडीजची धूरा
राजस्थानविरुद्धच्या खेळीमुळे चर्चेत आलेल्या रिंकू सिंगला एकवेळ बीसीसीआयने केले होते बॅन, वाचा किस्सा