सध्या क्रिकेट जगतात एक चर्चा जोरदार रंगलीये. ती म्हणजे जगातली सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलमध्ये नुकत्याच झालेल्या नो-बॉल वादाबद्दल. आयपीएलच्या १५व्या हंगामातील ३४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने- सामने होते. यावेळी राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकातील एका चेंडूमुळे दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंत चांगलाच भडकला. त्याने थेट आपल्या फलंदाजांना सामना सोडून परत येण्याचा इशाराही केला. इतकेच नाही, तर सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे सामन्यादरम्यानच पंचांशी चर्चा करण्यासाठी मैदानावर पोहोचले होते. हा वाद या हंगामातील सर्वात मोठा वाद मानला जात आहे. (No Ball Controversy Between DC vs RR)
खरं तर शेवटच्या ५ षटकात दिल्लीला (Delhi Capitals) विजयासाठी ३६ धावांची आवश्यकता होती. अशात रोवमन पॉवेलने (Rovman Powell) ओबेद मॅकॉयच्या (Obed McCoy) चेंडूवर सलग ३ गगनचुंबी षटकार ठोकत संघाच्या अपेक्षा जागवल्या. दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या कुलदीप यादवने पंचांना तिसरा चेंडू रिप्ले पाहण्यासाठी सांगितले. खरं तर कुलदीप आणि डगआऊटमध्ये बसलेल्या त्याच्या संघसहकाऱ्यांना वाटले की, चेंडू कमरेच्या वर आहे. त्यामुळे तो चेंडू नो बॉल असू शकतो. मात्र, मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी हा चेंडू नो बॉल देण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्लीने प्रश्न उपस्थित केला की, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय तपासासाठी पाठवला जाऊ शकला असता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आपल्या निर्णयावर ठाम राहिले पंच
शेवटच्या ३ चेंडूंवर दिल्लीला १८ धावांची आवश्यकता होती आणि पॉवेलने पहिल्या ३ चेंडूवर ३ षटकार खेचले होते. अशात जर हा चेंडू नो बॉल असता, तर दिल्लीला फ्री हिटसोबत ४ चेंडूत १८ धावा कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे सामन्याचा निकाल पलटू शकला असता. मात्र, असे काहीच झाले नाही. रागाच्या भरात पंत फलंदाजांना पुन्हा बोलावण्याचा इशाराही करताना दिसला. शेन वॉटसनने पंतला शांत करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याने कोचिंग स्टाफ प्रवीण आमरेंना पंचांशी चर्चा करण्यासाठी मैदानावर पाठवण्यात आले होते. मात्र, तरीही पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि दिल्लीला १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
#DC #RRvsDC #RishabhPant #NoBall #IPL2022 #ChotiBachiHoKya No ball
Pant
Gully Cricket 😅😅 #CSKvMI https://t.co/An15GnBaaN pic.twitter.com/Ad3XSgeS2T— Piyush A. Shejul (@piyuSHejul) April 22, 2022
तिसऱ्या पंचांकडे नाही पाठवू शकत निर्णय
यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, इतका मोठा वाद होऊनही तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय का पाठवण्यात आला नाही. नियमानुसार, मैदानावर उपस्थित असलेल्या पंचांनी बाद देण्याच्या निर्णयाव्यतिरिक्त इतर कोणताही निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवू शकत नाहीत.
आयपीएलमधील नियमांनुसार, मैदानावरील पंच फक्त बाद होणे आणि फ्रंट फुट नो बॉलच तिसऱ्या पंचांकडे पाठवू शकतात. आयपीएल नियमानुसार, तिसरे पंच नो बॉलचा तपास तेव्हाच करू शकतात, जेव्हा त्या चेंडूवर कोणतीही विकेट पडली असेल. खेळाची परिस्थिती पाहता पंच नितीन मेनन आणि निखिल पटवर्धन यांच्याकडे नियमानुसार खेळण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
राजस्थानने दिल्लीला या सामन्यात १५ धावांनी पराभूत करत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले. दुसरीकडे दिल्लीला सहाव्या क्रमांकावर घसरावे लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा
ब्रेकिंग! प्रविण आमरे यांच्यावर बंदी, तर पंत, ठाकूरवरही मोठी कारवाई; नो बॉलचा वाद आला अंगाशी
IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल