---Advertisement---

लिविंगस्टोनची गोलंदाजी पाहून भारतीय दिग्गजाला आठवला ‘तो’ वादग्रस्त व्यक्ती

Liam-Livingstone
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ सध्या अंतिम टप्प्याल आली आहे. साखळी फेरीतील अवघे काही सामने खेळायचे बाकी आहेत. सोमवारी (१६ मे) पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एक रंगतदार सामना पाहायला मिळाला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना १७ धावांनी जिंकला आणि पंजाबला प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर काढले. पंजाबसाठी लियाम लिविंगस्टोनने जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. याच पार्श्वभूमीवर माजी दिग्गज वसीम जाफरने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. मजेशीर पोस्ट, तसेच मिम्स शेअर केल्यामुळे नेहमीच चर्चेत देखील राहतो. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर देखील त्याने एक मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, जी चाहत्यांना खूप आवडली आहे. पंजाबचा अष्टपैलू लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) फलंदाजीमध्ये तर अपयशी ठरला, पण गोलंदाजी त्याने कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने टाकलेल्या चार षटकात २७ धावा खर्च केल्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

सामन्यात लिविंगस्टोनने लेग स्पिन आणि ऑफ स्पिन दोन्ही प्रकारची गोलंदाजी केली. जाफरने नेमका हाच मुद्धा उचलून धरला आणि ही पोस्ट शेअर केली. त्याने टाकलेल्या ऑफ स्पिन चेंडूच्या जाळ्यात सलामीवीर डेविड वॉर्रन (०) आणि कर्णधार रिषभ पंत (७) फसले. तर लेग स्पिन चेंडूवर रोवमन पॉवेलने (२) विकेट गमावली. हे तिन्ही खेळाडू स्वस्तात बाद झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी काही काळासाठी वाढल्या होत्या.

जाफरने लिविंगस्टोनला उद्देशून गुरमीत राम रहीम सिंगचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओत राम रहीम म्हणत आहे की, “मी लेग स्पिन, ऑफ स्पिन, यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण सर्वकाही करू शकतो. मी पूर्णपणे एक अष्टपैलू आहे.” जाफरने शेअर केलेली ही पोस्ट खूप कमी वेळात व्हायरल झाली आहे.

दरम्यान, उभय संघातील या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित २० षटकांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १४२ धावां करू शकला. परिणामी दिल्लीने १७ धावांनी विजय मिळवला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

आरसीबीने पाडला नवा पायंडा! गेल-एबीविषयी दाखवली कृतज्ञता; वाचा सविस्तर

‘सीएसके मॅनेजमेंटच्या वागणूकीमुळे नाराज आणि दुःखावलोय’, रविंद्र जडेजा; चेन्नई-जड्डू यांचे ब्रेकअप?

मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमारची जागा मिळालेला आकाश मधवाल आहे कोण? जाणून घ्या कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---