शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात आयपीएल १५चा १६वा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेला हा सामना गुजरात संघाने ६ विकेट्सने जिंकला. यावेळी गुजरातच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल निराश झाला. त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिलीये.
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने (Punjab Kings) लियाम लिविंगस्टोनच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या आणि गुजरातला १९० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान गुजरातने २० षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. हा गुजरातचा या हंगामातील सलग तिसरा विजय होता.
पराभवानंतर काय म्हणाला मयंक अगरवाल?
सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) म्हणाला की, गुजरातविरुद्धचा सामना खूपच संघर्षमय होता. मात्र, त्याच्या संघाने खूपच मेहनत घेतली. रबाडा आणि अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली. यासोबतच त्याने असेही सांगितले की, तो ओडियनचे समर्थन करतो.
एकेवेळी व्हिडीओ गेमच्या नादी लागलेला अकोल्याचा वाघ ‘दर्शन नळकांडे’ आयपीएल गाजवण्यास सज्ज
IPL2022| बेंगलोर वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL2022| चेन्नई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!