---Advertisement---

PBKS vs RCB| दोन नव्या कर्णधारांची कसोटी, अशी असू शकते पंजाब-बेंगलोर संघांची प्लेइंग इलेव्हन

On: रविवार, मार्च 27, 2022 12:46 PM
Faf-du-Plessis-and-Mayank-Agarwal
---Advertisement---

आयपीएल २०२२ चा तिसरा सामना रविवारी (२७ मार्च) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघांना नवीन कर्णधार लाभले आहेत. मयंक अगरवाल आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्व गुणांची परीक्षा या सामन्यात होईल. या दोघांवर योग्य प्लेइंग इलेव्हन निवडण्याची जबाबदारी असेल.

पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचे महत्वाचे खेळाडू जॉनी बेयरस्टो आणि कगिसो रबाडा पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. आरसीबीचा (Royal Challangers Bangalore) नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिससमोर प्रश्न असेल की, विराट कोहलीसोबत सलामीसाठी दुसऱ्या एखाद्या फलंदाजाला पाठवायचे की, स्वतः उतरावे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सुरुवातीच्या ४ किंवा ५ सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे डू प्लेसिस मध्यक्रमात उतरण्याची शक्यता अधिक आहे. युवा अनुज रावत विराट कोहलीसोबत सलामीसाठी येऊ शकतो.

मागच्या हंगामात आरसीबीकडे डावखुऱ्या आणि उजव्या फलंदाजांच्या रूपात विराट आणि देवदत्त पडिक्कल ही सलामीवीर जोडी होती. पण या हंगामात पडिक्कल आरसीबीसोबत नाही. अशात डावखुरा फलंदाज अनुज रावत विराटसोबत सलामीला येऊ शकतो. गोलंदाजी विभागीचा विचार केला, तर जोस हेजलवुड आणि जेसन बेहरेनडॉर्फही या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. मोहम्मद सिराजला डेविड विली आणि हर्षल पटेल यांची साथ मिळू शकते. वेळप्रसंगी शेरफेन रदरफोर्ड वेगवान गोलंदाजी करू शकतो. फिरकी गोलंदाजीची कमान वानिंदु हसरंग सांभाळेल.

पंजाब किंग्जचा विचार केला, तर मयंक अगरवाल आणि शिखर धवन डावाची सुरुवात करतील. त्यानंतर यष्टीरक्षक प्रभसिमरन सिंग किंवा जितेश शर्मा यांच्यातील एक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. लियाम लिव्हिंगस्टोन चौथ्या आणि शाहरुख खान पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फिनिशरच्या भूमिकेत भानूका राजपक्षे आणि ओडियन स्मिथ येऊ शकतात. राज बावा आणि ऋषी धवन यांना संधी मिळेल की, नाही हे पाहावे लागणार आहे. गोलंदाजांमध्ये अर्शदिप सिंग, संदीप शर्मा, राहुल चाहर आणि हरप्रीत ब्रार यांची साथ मिळेल.

पंजाब किंग्जची संभावित प्लेइंग इलेव्हन –
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, प्रभसिमरन सिंह/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, शाहरुख खान, भानुका राजपक्षे, ओडियन स्मिथ, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, राहुल चाहर, संदीप शर्मा.

आरसीबीची संभावित प्लेइंग इलेव्हन –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, डेविड विली, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या –

अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: प्रजीतरेड्डी मदीरेड्डी, अझलान शेख, वेदांत जोशी, अंशुल पुजारी यांची विजयी सलामी

पाकिस्तान ते दक्षिण आफ्रिका व्हाया इंग्लंड; क्रिकेटसाठी ‘असा’ प्रवास करणाऱ्या इम्रान ताहीरची संघर्षमय कथा

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २८ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---