रविवारी (२२ मे) आयपीएल २०२२ च्या साखळी फेरीचा शेवटचा सामना खेळला गेला. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबद संघ यामध्ये आमने-सामने होते. पंजाब किंग्जने ५ विकेट्स राखून सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली. पंजाब संघा प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला असला, तरी त्यांच्यासाठी हा विजय महत्वाचा होता. हंगामातील शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पंजाब संघातील सदस्य आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे दिसत होते.
आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंजाबच्या विजयानंतरचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत डगआउटमध्ये बसलेले पंजाब किंग्जचे सदस्य, खेळपट्टीवरील फलंदाज आणि त्यांचे चाहते आनंदात दिसत आहेत. सनरायझर्सचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक देखील या व्हिडिओत दिसत आहे. उमरान आणि लियाम लिविंगस्टोन यांच्यात सामना संपल्यानंतर काहीतरी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर पंजाबने सोपा विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मर्यादित २० षटकांमध्ये हैदराबादचा संघ ८ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा करू शकला. प्रत्युत्तरात पंजाबने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १५.१ षटकात गाठले.
That's that from Match 70 as @PunjabKingsIPL end their campaign on a winning note. Win by 5 wickets in 15.1 overs.
Scorecard – https://t.co/MmucFYpQoU #SRHvPBKS #TATAIPL pic.twitter.com/ujbQsZaUMz
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2022
हैदराबादसाठी त्यांचा सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वात मोठी खेळी केली. अभिषेकने ३२ चेंडूत ४३ धावा केल्या, यामध्ये त्याच्या ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. पंजाबच्या नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. पंजाबच्या संघाची फलंदाजी आल्यानंतर सलामीवीर शिखर धावनने ३२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. तर पाचव्या क्रमांकावर आलेल्या लियाम लिविंगस्टोनच्या फटकेबाजीमुळे पंजाबला १६ व्या षटकातच विजय मिळला. लिविंगस्टोनने अवघ्या २२ चेंडूत नाबाद ४९ धावा ठोकल्या. या धावा करण्यासाठी त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाचा बातम्या –
चार वर्षात आयपीएलचे विजेते बदलले, पण पंजाबने आपली जागा नाही सोडली; पाहा काय केलाय पराक्रम
पुणे वॉरियर्सचा विजय, तर सिटी एफसीची ईगलशी बरोबरी