भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ जूनला दिल्ली येथे खेळला जाणार आहे. अरूण जेटली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह या खेळाडूंंना विश्रांती दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक भारतीय खेळाडूंनी संघात जागा निर्माण केल्या आहेत. त्यातील हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक हे संघात पुनरागमन करणार आहेत. तसेच युजवेंद्र चहल, कुलदिप यादव यानांही संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर उमरान मलिक आणि अर्शदिप सिंग या युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे.
यामध्ये आपण अशा तीन खेळाडूंची माहिती पाहणार आहोत, ज्यांच्या कामगिरीवर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. आता ते कोणते खेळाडू ते आपण पाहुया,
१. हार्दिक पंड्या-
पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने आयपीएल पदापर्णातच विजेतेपद पटकावले आहेत. या हंगामात त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने १५ सामन्यात ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने चार अर्धशतके करत ८ विकेट्सही काढल्या आहेत. तसेच तो पंधराव्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला. फलंदाजीतील उत्तम कामगिरी आणि गोलंदाजीतही त्याची लय परत आल्याचे पाहून भारतीय संघ निवडअधिकाऱ्यांनी त्याला एक संधी दिली आहे.
२. दिनेश कार्तिक-
आयपीएल २०२२च्या हंगामात कार्तिक (Dinesh Karthik) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. त्याने या हंगामात अनेक सामन्यात कमी चेंडूत झटपट खेळी केली आहे. धडाकेबाद फलंदाजी करताना त्याने १६ सामन्यात ५५.०० सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. यावेळी १८३.३३ एवढा स्ट्राईक रेट असणाऱ्या कार्तिकला ‘स्ट्रायकर ऑफ द सिजनचा’ पुरस्कार देखील मिळाला आहे. यावेळी तो दहा सामन्यात नाबाद राहिला आहे.
कार्तिक भारतीय संघात २०१९च्या विश्वचषकानंतर परत आला आहे. जर त्याने हा फॉर्म दक्षिण आफ्रिका (INDvsSA) विरुद्ध ठेवला, तर त्याची टी२० विश्वचषकातही निवड होऊ शकते.
३. उमरान मलिक
आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याने ताशी १५७ किमी अधिक वेगाने गोलंदाजी करत संघनिवड अधिकाऱ्यांना विचार करायला लावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तो भारतीय संघात पदार्पण करणार आहे. दुसराच आयपीएल हंगाम खेळणाऱ्या या २२ वर्षीय खेळाडूने १४ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता.
गुजरात विरुद्धच्या साखळी सामन्यात उमराने ४ षटकात २५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल यांना जलद गतीने गोलंदाजी करून हैराण करणाऱ्या उमरानने जर योग्य दिशेने त्याची गोलंदाजी कायम ठेवली, तर त्याला विश्वचषकातही संधी मिळू शकते. अंतिम सामन्याआधी सर्वाधिक गतीने गोलंदाजी करणाऱ्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर होता. गुजरातकडून खेळणाऱ्या लोकी फर्ग्युसनने ताशी १५७.३ किमी वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोहली, राहुल अन् रोहितने खेळावर लक्ष द्यावे; कपिल पाजींनी तिघांना फटकारले
धोनी, सेहवाग, रैना सर्वच झाले निवृत्त, पण ‘त्या’ सामन्यात खेळलेला कार्तिक आजही टीम इंडियात
रहाणे आणि शर्माचे वय झालंय; ऑस्ट्रेलियच्या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान