आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये पार पडणार आहे. आयपीएल हंगामापूर्वी बीसीसीआय खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेत आहेत. १६ मार्चला यो-यो टेस्ट पार पडली. हार्दिक पंड्या पास झाला आहे, तर दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर पृथ्वी शाॅ यो-यो टेस्ट पास झालेला नाही.
यो-यो टेस्ट नापास झाल्यानंतर देखील पृथ्वी शाॅला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली जाणार आहे, परंतु त्याला सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान तो इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हणाला आहे की, त्याला याबाबतीत कोणी गैरसमज करू नये. यो-यो टेस्ट पास होण्यासाठी १६ गुणांची गरज होती, परंतु शाॅ १५ गुणांपर्यंत पोहोचला आहे.
शाॅने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर करत लिहिले आहे की, “तुम्हाला माझी परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे कृपया गैरसमज करू नका. तुम्हीच तुमचे कर्म ठरवत असता.” त्याची स्टोरी पाहून एकीकडे चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे, तर दुसरीकडे काहीजण त्याच्यासोबत सहानुभूती दाखवताना दिसत आहेत.
Always with you @PrithviShaw.
All the best 👍💯 pic.twitter.com/wpKpCByb49— Chiku (@Kohliisgoat) March 16, 2022
बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेसबाबत आकलन करण्यासाठी एनसीएमध्ये शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये हार्दिक पंड्या आणि पृथ्वी शाॅ यांचा समावेश होता. पंड्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आयपीएल खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
आयपीएल २०२२ (IPL 2022) चा हंगामातील अंतिम सामना २९ मे ला खेळला जाणार आहे. यावर्षी आयपीएल मुंबई आणि पुण्यामध्ये खेळली जाणार आहे. आगामी हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. यावर्षी आयपीएलच्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे का?’, अश्विनला चहलचा प्रश्न; वाचा काय आहे भानगड
‘यंदा आमचे प्रदर्शन जोरदार दिसेल, आमच्याकडे खूप सक्षम संघ’, राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाची हुंकार