ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून या संघांमध्ये कसोटी मालिका सुरु आहे. दुसऱ्या कसोटी अनिर्णीत राहिली असली तर या मालिकेत पाकिस्तानचे खेळाडू शानदार कामगिरी करताना दिसले. पाकिस्तानी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिजवान याने या कसोटीत चमकदार फलंदाजी केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील दूसरे शतक लगावले आहे.
रिजवानने (Mohammad Rizwan) कराची कसोटीच्या पाचव्या दिवशी सहाव्या क्रमांकावर १७७ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी खेळली आहे आणि सामना पराभूत होण्यापासून पाकिस्तानला वाचवण्यात महत्त्वपुर्ण भूमिका निभावली आहे.
रिजवानने सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला आणि शेवटपर्यंत कायम टिकून राहिला. तो २३५ मिनिटे मैदानात कायम टिकून राहिला. त्याने १७७ चेंडूत ११ चौकार लगावले आणि १ षटकार लगावला. २९ वर्षीय रिजवानने कर्णधार बाबर आझमसोबत पाचव्या विकेटसाठी ११५ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली आणि पाकिस्तानला पराभवापासून वाचवण्यासाठी यशस्वी झाला.
रिजवान कसोटीच्या चौथ्या डावात शतक ठोकणारा पाकिस्तानचा दूसरा यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्या अगोदर मोईन अलीने १९९५ मध्ये चौथ्या डावात शतक ठोकले होते. तसेच तो चौथ्या डावात शतक लगावणार जगातील आठवा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या अगोदर ऍडम गिलख्रिस्ट, रिषभ पंत, मॅट प्रायर आणि एबी डीविलयर्स यांनी चौथ्या डावात शतके ठोकली आहेत.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs PAK) यांच्यात पार पडलेली दूसरी कसोटी रोमांचक झाली. कसोटीच्या पाचव्या दिवशी सुद्धा मालिकेचा निकाल लागू शकला नाही, हा सामना अनिर्णीत राहिला. या दरम्यान पाहुणा संघ ही कसोटी आपल्या नावावर करु शकत होता, परंतु शेवटच्या दिवशी हा सामना अनिर्णीत राहिला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने शतक ठोकले. त्याने १९६ धावा केल्या. त्याने २ वर्षानंतर त्याने शतक ठोकले आहे. तसेच मोहम्मद रिजवानने नाबाद १०४ धावा केल्या आणि अब्दुल्लाह शफीकने ९६ धावा केल्या.
कसोटीच्या चौथ्या डावात शतक करणारे यष्टीरक्षक फलंदाज
१०३ धावा – एबी डिविलियर्स
१४९ धावा – ऍडम गिलख्रिस्ट
१०६ धावा – ऍलेन नॉट
११७ धावा – मोईन खान
१०१ धावा – मुस्तफिजूर रेहमान
११४ धावा – रिषभ पंत
११० धावा – मॅट प्रायर
१०४ धावा – मोहम्मद रिजवान
महत्त्वाच्या बातम्या-
जो रुटने २५ वे कसोटी शतक करत विलियम्सनला टाकले मागे, आता विराट-स्मिथच्या विक्रमावर नजर
‘कब खून खोलेगा रे तेरा’, बाबर आझमने २ वर्षांनंतर शतक केल्याने विराट कोहली होतोय ट्रोल
अश्विनकडून जास्तीत-जास्त शिकण्याचा प्रयत्न करणार ‘हा’ युवा अष्टपैलू; म्हणाला…