इंडियन प्रीमीयर लीग २०२२ आता अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामातील अंतिम सामना रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR) संघात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून रात्री ८.०० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या सामन्यानंतर संघांवर आणि काही खेळाडूंवर बक्षीसांचा पाऊसही पडणार आहे. बक्षीस रक्कमही मोठी आहे.
अंतिम सामन्यानंतर (IPL Final) पुरस्कार सोहळा पार पडेल. त्यावेळी ही बक्षीस रक्कम (Prize Money) संघांना आणि खेळाडूंना दिली जाईल. अंतिम सामना जिंकून आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे विजेतेपद (IPL 2022 Winner) जिंकणाऱ्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेत उपविजेत्या संघाच्या (IPL 2022 Runner-up) बक्षीस रकमेत यंदा वाढ करण्यात आली असून आता १३ कोटी रुपये या संघाला दिले जातील. यापूर्वी गेल्यावर्षी उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये देण्यात आले होते.
याबरोबरच तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील लखनऊ सुपर जायंट्स संघाला ६.५ कोटी रुपये बक्षीस दिले जातील.
याशिवाय वैयक्तिक पुरस्कारही पुरस्कार सोहळ्यात दिले जातील. यावेळी वैयक्तिक पुरस्कारांच्या बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी वैयक्तिक पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना १० लाख रुपये मिळाले होते. यावेळी त्यात वाढ झाली आहे. यावेळी सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला १५ लाख रुपये, सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला १५ लाख रुपये बक्षीस दिले जाईल.
तसेच सुपर स्ट्रायकर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला १५ लाख; सर्वाधिक षटकार, पॉवर प्लेअर, व्हॅल्यूएबल प्लेअर, गेम चेंजर अशा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंना १२ लाख रुपये दिले जातील. तसेच एमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला २० लाख रुपये दिले जातील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘कधी तुम्ही जिंकता, कधी हारता, पण…’, आरसीबीच्या चाहत्यांसाठी विराटची हृदयाला भिडणारी पोस्ट
महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत लॉराचा जलवा! बनली आख्खा एक हंगाम गाजवणारी पहिलीच खेळाडू
Womens T20 Challenge। फायनल सामन्यात पाय ठेवताच हरमनप्रीत बनली ‘अशी’ कामगिरी करणारी एकमेव खेळाडू