इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामासाठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह सातव्या आस्मानावर आहे. कोविड-१९ च्या संकटानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन झाले आहे. तसेच बंद दाराआड सामने न होता, प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे. याखेरीज २ नव्या फ्रँचायझीही आयपीएलमध्ये सहभागी झाल्या असल्याने यंदाच्या हंगामाचा रोमांच शिखरावर असेल.
अशात आयपीएलपूर्वी (IPL 2022) फ्रँचायझी, खेळाडू आणि दर्शकांना विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती आणि काय बक्षीस मिळेल? तसेच प्लेऑफमधील तिसरा आणि चौथा संघ किती पारितोषिक मिळवेल? आणि खेळाडूंनाही त्यांच्या प्रदर्शनासाठी किती रुपयांची बक्षिसे मिळतील? याची सर्वांना उत्सुकता असेल. (IPL 2022 Prize Money)
येथे आपण त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ…
आयपीएल २०२२ च्या विजेत्या संघाला तब्बल २० कोटींचे बक्षिस दिले जाईल. तर उपविजेता संघ १३ कोटींचा पारितोषिक मिळवेल. विजेत्या- उपविजेत्याव्यतिरिक्त प्लेऑफमधील तिसऱ्या आणि चौथ्या संघालाही बक्षीसे मिळतील. तिसरा संघ ७ कोटी तर चौथा संघ ६.५ कोटी मिळवेल.
तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑरेंज कॅप विजेत्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंवरही बक्षीसांचा वर्षाव होईल. या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जातील. त्यांच्या बरोबरीने हंगामातील सुपर स्ट्राइकरलाही १५ लाख दिले जातील. तर सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला, पावर प्लेयर ऑफ द सीजन, मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर आणि गेमचेंजर ऑफ द सीजन यांनाही प्रत्येकी १२ लाखांची बक्षिसे दिली जातील. इमर्जिंग प्लेयरलाही २० लाख रुपयांचे बक्षीस भेटेल.
पाहा कोणाला मिळणार किती बक्षीसे?
विजेता- २० कोटी
उपविजेता- १३ कोटी
प्लेऑफचा तिसरा संघ- ७ कोटी
प्लेऑफचा चौथा संघ- ६.५ कोटी
सुपर स्ट्राइकर- १५ लाख
सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू- १२ लाख
पावर प्लेयर ऑफ द सीजन- १२ लाख
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर- १२ लाख
गेमचेंजर ऑफ द सीजन- १२ लाख
इमर्जिंग प्लेयर- २० लाख
ऑरेंज कॅप विजेता- १५ लाख
पर्पल कॅप विजेता- १५ लाख
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजा का बनला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, ‘ही’ आहेत ५ महत्त्वाची कारणे
सलग ४ वनडे विश्वचषकात ४ शतके, न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा कोणत्या पुरुष क्रिकेटरलाही न जमलेला पराक्रम
पाकिस्तानच्या पराभवाने भारताला फायदा, कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत गाठला ‘हा’ क्रमांक