आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्च रोजी झाली. या हंगामातील तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने सामने असतील. हा सामना रविवारी (२७ मार्च) मुंबईत खेळला जाणार आहे. पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील हा चालू हंगामातील पहिला सामना असून दोन्ही संघांना नवीन कर्णधार मिळाले आहेत. पंजाब किंग्जसाठी मयंक अगरवाल आणि आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिस पहिल्यांदाचा कर्णधाराची भूमिका साकारणार आहेत. चला तर जाणून घेऊया पंजाब आणि आरसीबीच्या या सामन्याविषयी सर्वकाही
मागच्या हंगामात विराट कोहलीने आरसीबीचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आणि संघाचे नेतृत्व करण्यासाठी आरसीबीने फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) याला मेगा लिलावात खरेदी केले. मागच्या हंगामात सीएसकेसाठी त्याने जबरदस्त प्रदर्शन केले होते, पण आरसीबीने मेगा लिलावात बाजी मारून त्याला संघात सामील केले.
दुसरीकडे केएल राहुलने पंजाब किंग्जची साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद स्वीकारले. अशात पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्या खांद्यावर येऊन पडली.
आयपीएल २०२२ हंगामातील पंजाब विरुद्ध बेंगलोर सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामना केव्हा खेळला जाईल ? (PBKS vs RCB Match Date)
– पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील हा सामना आयपीएल २०२२ हंगामातील तिसरा सामना असून तो रविवारी, म्हणजेच २७ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
२. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना कुठे खेळला जाईल ? (PBKS vs RCB Match Venue)
– पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना मुंबई स्थित डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल.
३. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना किती वाजता खेळला जाईल ? (PBKS vs RCB Match Timing)
– पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी सांयकाळी ७ वाजता नाणेफेक होईल.
४. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना कोणत्या वाहिनीवर पाहता येऊ शकतो ? (PBKS vs RCB Match TV Channel)
– पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येऊ शकतो.
५. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना मोबाईलवर कसा पाहता येऊ शकतो ? (PBKS vs RCB Match Mobile Streaming)
– पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना मोबाईलवर डिजनी प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून पाहता येऊ शकतो.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
पंजाब किंग्ज –
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, प्रभसिमरन सिंह/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, शाहरुख खान, भानुका राजपक्षे, ओडेन स्मिथ, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, राहुल चाहर आणि संदीप शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, डेविड विली आणि मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या –
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल दिल्ली वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| पंजाब वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!