अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात शुक्रवारी (२७ मे) दुसरा क्वालिफायर सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्सने ७ विकेट्सने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे राजस्थान संघाने सामन्यानंतर मोठा जल्लोष केला.
आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) खेळण्याची ही राजस्थानची (Rajasthan Royals) दुसरी वेळ असणार आहे. यापूर्वी त्यांनी १४ वर्षांपूर्वी २००८ साली आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी अंतिम सामना जिंकत पहिली आयपीएल ट्रॉफीही जिंकली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची रविवारी (२९ मे) संधी असणार आहे. त्यासाठी त्यांना गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे.
राजस्थानच्या खेळाडूंचा जल्लोष
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier 2) बेंगलोरने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग राजस्थानने जोस बटलरने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर १९ षटकातच पूर्ण केला. बटलरने (Jos Buttler) १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राजस्थानसाठी विजयी षटकार मारला. या षटकारानंतर त्याने जोरदार जल्लोष केला. तसेच त्याने १८ व्या षटकात शतक पूर्ण केले होते. त्यावेळीही त्याने हवेत उडी घेत आनंद व्यक्त केला होता.
दरम्यान, बटलरच्या विजयी षटकारानंतर राजस्थानच्या संघातही उत्साहाचे वातावरण दिसले. खेळाडू एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त करत होते. त्याचबरोबर मैदानातील राजस्थानच्या चाहत्यांचाही उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. यावेळी बीसीसीआयचे सचिन जय शाह हे देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. ते देखील राजस्थानचे कौतुक करत टाळ्या वाजवाना दिसले. याशिवाय दोन्ही संघांचे खेळाडूही एकमेकांना शुभेच्छा देताना आणि बटलरच्या शतकाबद्दल त्याचे अभिनंदन करताना दिसले (Rajasthan Royals Winning Celebration).
सामन्यानंतर मैदानातील वातावरणाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही आल्या आहेत.
WHAT. A. WIN for @rajasthanroyals! 👏 👏
Clinical performance by @IamSanjuSamson & Co. as they beat #RCB by 7⃣ wickets & march into the #TATAIPL 2022 Final. 👍 👍 #RRvRCB
Scorecard ▶️ https://t.co/orwLrIaXo3 pic.twitter.com/Sca47pbmPX
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
राजस्थानचा अंतिम सामन्यात प्रवेश
क्वालिफायर दोनच्या सामन्यात बेंगलोरने (Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore) प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्या. यात रजत पाटीदारने (Rajat Patidar) ५८ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त एकाही बेंगलोरच्या फलंदाजाला ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाही. राजस्थानकडून गोलंदाजी करताना ओबेड मॅकॉय आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर राजस्थानकडून फलंदाजीत जोश बटलरने शानदार शतक करताना १०६ धावांनी नाबाद खेळी केली. त्यामुळे राजस्थानने १९ व्या षटकातच १६१ धावा करत विजय मिळवून अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL प्लेऑफमध्ये वॉर्नरला पछाडत बटलरने दाखवला ‘जोश’! पाटीदारचाही विक्रमाच्या यादीत समावेश
बटलर मारण्यात अन् सिराज-हसरंगा षटकार खाण्यात आघाडीवर; RCBच्या गोलंदाजांचा नकोसा विक्रम
फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज