रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) झाला. ७ विकेट्स राखून हा सामना जिंकत राजस्थानने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात त्यांची भिडंत गुजरात टायटन्सशी होईल. या सामन्यात राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी असेल.
गुजरातविरुद्धच्या (GT vs RR) सामन्यात एक विकेट घेताच चहल (Yuzvendra Chahal) एका आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिलाच फिरकीपटू (Most Wickets By Spinner In IPL Season) बनेल. यासह तो इमरान ताहिरचा (Imran Tahir) विक्रम मोडेल. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमात भारतीय गोलंदाज अमित मिश्राचीही (Amit Mishra) बरोबरी करेल.
इमरान ताहिरला सोडले मागे
फिरकी गोलंदाज चहलने गुजरातच्या एका फलंदाजाला बाद केले तर तो एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करेल. या विक्रमात तो दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहिरला मागे सोडेल. ताहिरने २०१९ हंगामात २६ विकेट्स घेतल्या होत्या, ज्या कोणत्या फिरकीपटूने एका हंगामात घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स होत्या. चहलही २६ विकेट्ससह या ताहिरसोबत बरोबरी साधून आहे. चहलने चालू आयपीएल हंगामात १६ सामने खेळताना या विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सध्या पर्पल कॅपही त्याच्याच डोक्यावर आहे.
अमित मिश्राचीही केली बरोबरी
याबरोबरच चहलकडे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाज अमित मिश्राचीही बरोबरी करण्याचीही संधी आहे. फिरकी गोलंदाज मिश्रा १५४ आयपीएल सामन्यात १६६ विकेट्ससह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे. चहल गुजरातविरुद्ध एक विकेट घेत मिश्राच्या या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. चहलच्या खात्यात आता १३० आयपीएल सामन्यात १६६ विकेट्स आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबी हारली, पण पाटीदारने मनं जिंकली; ८ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीयाने आयपीएलमध्ये ‘ही’ कमाल केली






