IPL 2022 | राजवर्धन हंगरगेकरला ‘कॅप्टनकूल’ धोनीचा सल्ला, ‘या’ गोष्टीत करायला सांगितली सुधारणा

IPL 2022 | राजवर्धन हंगरगेकरला 'कॅप्टनकूल' धोनीचा सल्ला, 'या' गोष्टीत करायला सांगितली सुधारणा

आयपीएल २०२२ हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सर्व संघ आगामी हंगामासाठी तयार आहेत आणि सराव करत आहेत.  एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाचाही चांगलाच सराव सुरू आहे. धोनीचा सीएसके संघ यावर्षी त्यांची ५ वी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. अशात धोनी त्यांच्या सहकारी खेळाडूंसोबत मजा मस्ती करताना दिसला आहे. सीएसकेचे युवा खेळाडू राजवर्धन हंगरगेकर आणि शिवम दुबे यांना धोनीने फुटबॉल खेळात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.

सीएसके (CSK) संघाने सध्या सुरतमध्ये त्यांचा कॅम्प लावला आहे आणि त्याठिकाणी संघ सराव करत आहे. राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यावेळी चर्चा करत होते. धोनीकडून हंगरगेकरला मैदानात स्वतःच्या इच्छेनुसार खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. अशात धोनीने त्याची फिरकी घेत सल्ला दिला की, “त्याने (हंगरगेकर) स्वतःच्या फुटबॉल कौशल्यामध्ये सुधार केला पाहिजे.”

हंगरगेकर म्हणाला की, “सरावाच्या पहिल्या दिवशी एमएस धोनीने मला सांगितले की, जे मी आधीपासून करत आलो आहे, त्याच्यासोबत पुढे जा. काहीच बदलण्याची गरज नाही. तेच करत राहा जे तू खरोखर चांगले करत आला आहे. माझ्यासाठी हा एक चांगला सल्ला होता की, मला ते करण्याचे स्वातंत्र आहे, जे मी करत आहे. मला ही संधी देण्यासाठी मी खरंच सीएसके कुटुंबाचा आभारी आहे. मी संघासाठी मैदानावर माझे सर्वकाही देईल आणि सीएसकेची मान उंचावेल.”

यादरम्यान शुवम दुबे (Shivam Dube) याने सीएसकेसोबतचा त्याचा आतापर्यंतचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, “आम्ही सुरतमध्ये सराव आणि याठिकाणच्या सुविधांचा लाभ घेत आहोत. सर्वकाही तसेच आहे, जसे आम्हाला पाहिजे होते. आम्ही याचा आनंद घेत आहोत, जे अधिक महत्वाचे आहे आणि योग्य पद्धतीने काम करत आहोत.”

दरम्यान, आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमध्ये होईल, जे मागच्या वर्षी अंतिम सामन्यामध्ये आमने सामने होते.

महत्वाच्या बातम्या –

अन् ‘त्या’ षटकाराने दिनेश कार्तिक हिट झाला!

सचिनने बरोबर १० वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळलेला ‘तो’ सामना अविस्मरणीयच, कारणही आहे खास

आरसीबीचा १०.७५ कोटींच्या हुकमी एक्काचा ‘या’ गोष्टीमुळे वाढलाय आत्मविश्वास, आयपीएल २०२२मध्ये दाखवणार जलवा

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.