इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम संपला आहे. या हंगामाच्या विजेत्या गुजरात टायटन्स संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाची धूळ चारली. हा सामना त्यांनी ७ विकेट्सने जिंकत आयपीएलमध्ये धडाकेबाज पदार्पण केले आहे. तत्पूर्वी गुजरात संघाचा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याने अंतिम सामन्याआधी माध्यमांशी चर्चा केली आहे. यावेळी त्याने एका गोलंदाजाचा उल्लेख करत त्याची पुढील कामगिरी यशस्वी होईल अशी भविष्यवाणी केली आहे. त्याचबरोबर त्याने या आयपीएल हंगामातील त्याचा प्रवास वर्णलेला आहे.
अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिदला गुजरातने आयपीएल २०२२च्या लिलावामध्ये १५ कोटी रुपयांमध्ये संघात विकत घेतले. या हंगामात त्याला कमी जरी विकेट्स मिळाल्या असल्या तरी त्याने फलंदाजावर आपला दबाव ठेवला. त्याने अंतिम सामन्यात ४ षटकात १८ धावा देत १ विकेट घेतली आहे. तसेच त्याने या हंगामाच्या १६ सामन्यांत ६.६च्या इकॉनॉमी रेटने १९ विकेट्स घेतल्या आहेत.
अंतिम सामन्याआधी त्याने माध्यमांना नवीन संघ गुजरातमध्ये कशाप्रकारे आपला प्रवास सुरू झाला. तसेच, आशिष नेहरा हे कोणावरच दबाव आणत नाही हे पण स्पष्ट केले आहे. राशिदने या आयपीएलमध्ये फलंदाजीतही हातखंडा वापरत नेटमध्ये त्याचा अधिक सराव केला याविषयी सांगितले आहे. या आयपीएलमध्ये त्याने नऊ षटकार मारले आहेत. तसेच, पुढे रवी बिश्नोईचा उल्लेख करत त्याची गोलंदाजी उत्तम असल्याचे म्हटले आहे.
“माध्यमांशी केलेल्या चर्चेमध्ये राशिदने बिश्नोई या प्रभावी गोलंदाजाचे कौतुक केले आहे. त्याने अधिक मेहनत घेतली, तर तो फक्त आयपीएलच नाहीतर आतंरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करेल”, असे राशिदने बिश्नोईबाबत म्हटले आहे.
पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा बिश्नोईने २०२० आणि २०२१ या हंगामांमध्ये मिळून २३ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या. टी२० प्रकारामध्ये उत्तम असलेल्या बिश्नोईला पंजाबने २ कोटी रूपयांंत संघात घेतले. चेंडू वळवण्यामध्ये आणि फलंदाजाला हैराण करणाऱ्या गोलंदाजाला लखनऊ सुपर जायंट्सने २०२२च्या लिलावात केएल राहुलसोबत संघात घेतले.
या २१ वर्षीय फिरकीपटूने पंधराव्या आयपीएल हंगामातील १४ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याने यावर्षी भारतीय संघात पदार्पण करत कोलकाता येथे झालेल्या विंडीज विरुद्धच्या टी२० सामन्यात पूर्ण ४ षटके टाकली. १७ धावा देताना त्याने २ विकेट्स घेत उत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्याने ४ टी२० सामने खेळली आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रँट’चं उदाहरण आहे हार्दिक पंड्या; गंभीर, रोहितनंतर केलीय ‘ही’ कमाल
आयपीएल जिंकणारा हार्दिक चौथाच भारतीय कर्णधार; पाहा आयपीएल विजेत्या संघनायकांची संपूर्ण यादी
राजस्थानच्या जुन्या खेळाडूनेच केला ‘रॉयल्स’चा घात, अंतिम सामन्यात चोप चोप चोपले