आयपीएल २०२२चा पंधरावा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) यांच्यात खेळला गेला. लखनऊने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकत हंगामातील सलग तिसरा विजय नोंदवला आहे. या सामन्यादरम्यान लखनऊच्या युवा गोलंदाज रवी बिश्नोई याने दिल्लीच्या अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर याची विकेट घेत मोठा पराक्रम केला आहे.
युवा फिरकीपटू बिश्नोईपुढे (Ravi Bishnoi) वॉर्नर नेहमीच फेल ठरला आहे. या सामन्यातही बिश्नोईने वॉर्नरला (David Warner) आयुष बदोनीच्या हातून ४ धावांवर बाद केले. ही बिश्नोईने वॉर्नरला आयपीएलमध्ये बाद करण्याची तिसरी वेळ होती. या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत एकमेकांशी ३ वेळा आमना सामना झाला आहे. यादरम्यान वॉर्नरने त्याच्या ६ चेंडूंचा सामना केला आहे आणि केवळ ५ धावा केल्या आहेत. अर्थातच बिश्नोईने सरासरी त्याच्या प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर वॉर्नरला (Warner Failed In Front Of Bishnoi) पव्हेलिनयला धाडले आहे.
वॉर्नरने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये १० हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात तो सहाव्या क्रमांकावर आहे. तरीही त्याने २१ वर्षीय गोलदांजाकडून अशाप्रकारे बाद होणे दुर्दैवी आहे.
बिश्नोईने वॉर्नरव्यतिरिक्त रोवमन पॉवेल याचीही स्वस्तात विकेत घेतली. त्याने पॉवेलला ३ धावांवर त्रिफळाचीत केले. अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना त्याने २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. बिश्नोईव्यतिरिक्त कृष्णप्पा गौथम यानेही संघाला मोठी विकेट मिळवून दिली. त्याने दिल्लीचा अर्धशतकवीर पृथ्वी शॉ याला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून झेलबाद केले. शॉ ६१ धावांवर बाद झाला.
लखनऊचा विजयरथ सुस्साट
लखनऊने आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात पराभवासह केली होती. गुजरात टायटन्सने त्यांना ५ विकेट्स राखून पराभूत केले होते. मात्र या पराभवानंतर लखनऊने जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसऱ्या सामन्यात अनुभवी चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सने धूळ चारली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादला १२ धावांनी पराभूत करत दुसरा विजय नोंदवला व आता दिल्लीला चितपट करत विजयाची हॅट्रिक केली आहे. या पराक्रमासह लखनऊ संघ सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| पंजाब वि. गुजरात सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
दिल्लीच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर फलंदाजांवर भडकला रिषभ पंत; म्हणाला, ‘फलंदाजीत आम्ही…’
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल पंजाब वि. गुजरात सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही