आयपीएल २०२२ ची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी चांगली झालेली नाही. हंगामातील पहिल्याच सामन्यात त्यांना पंजाब किंग्जकडून अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागला आहे. रविवारी (२७ मार्च) झालेल्या या सामन्यात आरसीबीने मोठी धावसंख्या केली होती, पण तरीही पंजाबने बाजी मारली. शेवटच्या काही षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि आरसीबीच्या तोंडचा घास पळवला. आरसीबीचा नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिस याने पराभवाचे कारण स्पष्ट करताना महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सामना संपल्यानंतर फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) म्हणाला की, “मला वाटते की, फलंदाजी खरंच चांगली होती. शेवटी आम्ही जो झेल सोडला, तो महागात पडला. ओडियन स्मिथने ८ चेंडूत २५ धावा केल्या. मला वाटते आम्ही शक्यतो तो १० धावांवर खेळत असताता त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर टॅलेंजर्सने चांगला खेळ दाखवला.”
डू प्लेसिसने पराभवासाठी मैदानातील दव देखील करणीभूत असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “त्याठिकाणी थोडे दव होते, गोलंदाजांसाठी खूप आवघड रात्र होती. मला वाटते त्यांनी ओल्या चेंडूने चांगले प्रदर्शन केले. फलंदाजांनी (पंजाब किंग्जचे) खरोखर चांगल्या प्रकारे लक्ष्याचा पाठलाग केला.”
“त्यांनी खरोखर पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी केली होती. दुसऱ्या डावात चेंडू थोडा स्किड झाला आणि नंतर आम्ही सामन्यात अप्रतिमरित्या पुनरागमन केले. आम्ही मधल्या षटकांमध्ये खूप चांगल्या गोष्टी केल्या, पण तुम्हाला माहिती आहे, ओडियन स्मिथ तुमच्यासोबत काय करू शकतो. त्यासाठी तुम्हाला त्या संधी योग्य पकडाव्या लागतील. शाहरुख खानने देखील शेवटच्या षटकांमध्ये कमाल प्रदर्शन केले.”
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २ विकेट्सच्या नुकसानावर २०५ धावा केल्या. यामध्ये कर्णाधार डू प्लेसिसने सर्वाधिक ८८ धावा केल्या. त्यानंतर माजी कर्णधार विराटने ४१ आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने ३२ धावांची झटपट खेळी केली केली.
प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि एक षटक शिल्लक ठेऊन २०८ धावा ठोकल्या आणि विजय मिळवला. पंजाब किंग्जसाठी ओडियन स्मिथने शेवटच्या षटकात केलेल्या २५ धावा बहुमूल्य ठरल्या. या प्रदर्शनसाठी त्याला सामनावीर निवडले गेले. शिखर धवन आणि भानूका राजपक्षाने प्रत्येक ४३-४३ धावा केल्या. तसेच कर्णधार मयंक अगरवालचे ३२ धावांचे योगदान दिले.
महत्वाच्या बातम्या –
‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन!’, पंजाबविरुद्ध २०५ धावा करूनही पराभव झाल्याने आरसीबी ट्रोल
आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल गुजरात वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही