आयपीएल २०२२ हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन त्याच्या परीने चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. परंतु चाहत्यांना त्याच्याकडून अपेक्षित असलेली खेळी त्याला अद्याप करता आलेली नाहीये. अशातच मंगळवारी (२६ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा तो पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RR vs RCB) यांच्यातील मंगळवारचा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या ३३ असताना राजस्थानने वरच्या फळीतील दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आला, पण तो देखील मोठी खेळी करू शकला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संजू सॅमसनने त्याच्या डावाची सुरुवात जोमात केली, पण त्याला ही सुरुवात मोठ्या खेळीमध्ये रूपांतरीत करू शकला नाही. वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने त्याला त्रिफळाचीत केले. हसरंगाने राजस्थानच्या डावातील १०वे षटक टाकले. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सॅमसन तंबूत परतला. सॅमसनने २१ चेंडू खेळले आणि यामध्ये २७ धावा केल्या. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात तो विकेट गमावून बसला आणि यानंतर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आला. सोशल मीडियावर नेटकरी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांनी त्याची बरोबरी पाकिस्तानचा माजी खेळाडू उमर अकमलसोबत केली आहे.
Sanju Samson is just a well behaved, better discipline and more hardworking version of Umar Akmal but both remain consistent on being brain dead on most occasions whole batting
— . (@AnasMagnificent) April 26, 2022
Sanju samson cannot be included in International team if he can't play spin. He is terrible with Hassaranga. Probably dismissed more than 10times. #IPL2022
— Ram Charan stan (@averageroutines) April 26, 2022
Sanju Samson vs Hasaranga in T20:
Runs – 18
Balls – 21
Dot – 16
Wicket – 5— Johns. (@CricCrazyJohns) April 26, 2022
There is no need to play the reverse sweepp by sanju samson… He really throw his wicket.. Not on a special ball… He can hit six in the right way on that balll
— Hemant Kaushal (@HemantK25275960) April 26, 2022
Sanju Samson is already not a good player
Chameera – Rohit faceoff is ????
— Visheshta Jotwani ❤️???? (@visheshtaaa_j15) April 26, 2022
Hasaranga just owns sanju Samson ???? pic.twitter.com/wtHjLj9GKc
— The unknown guy (@Furquanalig) April 26, 2022
Really disappointed with the back to back reverse sweep attempts from Sanju Samson, he is such a clean striker down the ground so it wasn't really needed.
— Arjun (@LifeIsAnElation) April 26, 2022
Hasaranga is not even that good lol gully bowler. This guy Sanju Samson literally gifts him wickets on a gold plate. He could’ve hit that for a six over his head. Smh no point in playing that reverse sweep.
— Hawkeye (@Samuel1999999) April 26, 2022
राजस्थानच्या फलंदाजीचा विचार केला, तर त्यांनी मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १४४ धावा केल्या. राजस्थानने पावर प्लेमध्ये देवदत्त पडिक्कल (७), रविचंद्र अश्विन (१७) आणि जोस बटलर (८) यांच्या रूपात तीन महत्वाच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. त्याचाच परिणाम संघाच्या धावसंख्यावर पाहायला मिळाला. रियान परागमने ३१ चेंडूत नाबाद ५६ धावा ठोकल्या. परागमने दिलेले योगदान सर्वोत्तम ठरले. जोस हजलवुड, वानिंदु सहरंगा आणि मोहम्मद सिराजने आरसीबीसाठी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेल एक विकेट नावावर करू शकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
RCB vs RR। विराट कोहलीविषयी मोठी अपडेट, आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचा बदल