दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खुलासा केला आहे. तो दौरा त्याच्यासाठी टर्निंग पाॅइंट होता, कारण यावेळी भारतीय संघाने अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत शानदार कामगिरी करत यश मिळवले होते. त्यावेळी पंतने इंजेक्शन घेऊन एक सामना खेळला होता. याबद्दल पंतनेच खुलासा केला आहे.
ड्रिम इलेव्हनच्या युट्यूब चॅनलवर बोलताना पंतने असाही खुलासा केला आहे की, त्याला संघातून बाहेर केल्यानंतर त्याने सर्वांशी बोलणे सोडले होते. पंतने सिडनी आणि ब्रिस्बेन (India vs Australia ) येथील शेवटच्या दोन कसोटींमध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शानदार डाव खेळले, ज्यामुळे पराभवाच्या दिशेने चालल्याला भारतीय संघाला मालिका जिंकण्यास मदत झाली. त्यादरम्यान पंतसाठी सर्व काही चांगले नव्हते आणि २०१९ च्या विश्वचषकापूर्वी त्याला भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघातून बाहेर करण्यात आले होते.
तो म्हणाला, “या दरम्यान मी कोणाशीच बोलत नव्हतो, माझे कुटूंब आणि मित्रांसोबत सुद्धा नाही. मला एकांतात वेळ घालवण्याची गरज होती. मला दररोज माझे २०० टक्के द्यायचे होते. मी विचार करत होतो की, आता काय होईल. तेव्हा मी २२-२३ वर्षांचा होतो. मानसिकरित्या हा माझ्या आयुष्यातील कठिण काळ होता.”
तो म्हणाला की, “मी एकटा बसून विचार करु लागलो व्यक्तिगतरित्या आता मला काय केले पाहिजे.” नंतर पंत पुनरागमन करण्यात यशस्वी झाला. यावर बोलताना पंत म्हणाला, “माझ्या डोक्यात केवळ हाच विचार होता की, काहीही झाल तरी मला प्रत्येक दिवशी खूप कष्ट करायचे आहेत. याचे परिणाम जे होतील ते स्विकार करेन. मी स्वत:ला सांगत होतो की, माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मला उत्तम कामगिरी करावी लागेल. मला भारताला जिंकवावे लागेल.”
ऑस्ट्रेलियावर भारताने कसोटी मालिकेत २-१ ने मिळवलेल्या विजयात रिषभ पंतचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने ५ डावात ६९ च्या सरासरीने २७४ धावा केल्या. ऍडिलेड येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटीमध्ये वृद्धिमान साहाला दुखापत झाल्यामुळे पंतचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये करण्यात आला. तिसऱ्या कसोटी दरम्यान पंतच्या कोपराला दुखापत झाली होती, तरी देखील इंजेक्शन घेऊन त्याने ९७ धावांची उत्तम खेळी खेळली.
तो म्हणाला, “मी सामन्यादरम्यान इंजेक्शन घेतले. नेटमध्ये जाऊन बॅट पकडण्याचा सराव करत होतो. परंतु, खूप त्रास होत होता. मी घाबरलो होतो आणि दुखापत झाल्यामुळे भिती सुद्धा वाटत होती.” यानंतर पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी खुप वेगवान गतीने गोलंदाजी केली. शतक हुकल्याचे त्याला अजिबात दु:ख झाले नसल्याचे त्याने सांगितले. परंतु, त्याला वाईट वाटत होते. तो बाद झाल्यानंतर आर अश्विन आणि हनुमा विहारीने सामना अर्निणीत ठेवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
मराठीत माहिती- क्रिकेटर दिलीप वेंगसरकर
स्वस्तात आऊट झाल्यावर तंबूत मॅक्सवेलची मालीश करताना दिसला विराट कोहली, Video तुफान Viral