आयपीएलच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य संघात गणला जाणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. सीएसकेने आतापर्यंत आयपीएलच्या १४ हंगामांपैकी चार हंगामात विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा सीएसके दुसरा संघ आहे. सीएसकेने चालू हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत आणि पुढचा सामना त्यांना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी फ्रँचायझीने सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मोठमोठे शॉट खेळताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आयपीएलमध्ये दुसरा सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारा संघ असला, तरी चालू हंगामात त्यांना अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाहीये. आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील सुरुवातीच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोन सामने सीएसकेने जिंकले आहेत. गुणातिलेक सध्या संघ खालून दुसऱ्या म्हणजेच नवव्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे ४ गुण आहेत. असे असले, तरी सीएसकेचा सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) समाधानकारक फलंदाजी करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला उथप्पाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत उथप्पाने सराव सत्रात मारलेले मोठे शॉट्स दिसत आहेत. व्हिडिओत उथप्पा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि त्याच्या बॅटमधून काही मोठे शॉट्स निघाल्याचेही दिसत आहे. त्याची उत्कृष्ट फलंदाजी पाहून चाहत्यांनी व्हिडिओला हजारोंच्या संखेत लाईक्स दिल्या आहेत. सोबतच अनेकजण यावर व्यक्त देखील झाले आहेत.
Behind the Batman "Scenes"📽️🏏#Yellove #WhistlePodu 🦁💛 @robbieuthappa pic.twitter.com/MSKc2EhycS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 29, 2022
सीएसकेच्या या सलामीवीर फलंदाजाकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. सीएसकेच्या आधी तो काही इतर आयपीएल फ्रँचायझींसोबत देखील खेळला आहे. चालू हंगामात त्याने काही महत्वाच्या सामन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले आहे. चालू हंगामात आतापर्यंत त्याला प्रत्येक सामन्यात सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने संधी दिली आहे.
आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून २२८ धावा निघाल्या आहेत. यादरम्यान दोन वेळा त्याने अर्धशतकी खेळी केली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८८ होती. त्याने चालू हंगामात आतापर्यंत १९ चौकार आणि १४ षटकार ठोकले आहेत. उथप्पाच्या आयपीएल कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर तो एकूण २०१ सामने खेळला आहे आणि यामध्ये ४९५० धावा केल्या आहेत. यामध्ये २७ अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ६ वेळा ग्रँड स्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या दिग्गज टेनिसपटूला अडीच वर्षांचा तुरुंगवास
भीमपराक्रम! अवघ्या २१व्या वर्षी पठ्ठ्याने चोपल्या ५७८ धावा