---Advertisement---

RCB vs MI सामन्यात घुसणे चाहत्याच्या अंगाशी; पोलिसांना नडल्याने गेला थेट तुरुंगात

Rohit-Sharma-And-Virat-Kohli
---Advertisement---

शनिवारी (दि. ०९ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात आयपीएल २०२२चा १८वा सामना पार पडला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेंगलोरने ७ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई संघाची पुन्हा एकदा निराशा झाली. त्यांना हंगामात सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. अशात या सामन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. सामन्यादरम्यान सुरक्षा घेरा तोडत मैदानात घुसून रोहित शर्मा आणि विराट कोहलीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलीये.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने रविवारी (दि. १० एप्रिल) सांगितले की, २६ वर्षीय व्यक्तीचे नाव दशरथ जाधव असून तो महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्यक्ती फलंदाजी करणाऱ्या बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीशी हातमिळवणी करत क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित शर्माकडे धावला. मात्र, यावेळी त्याला पकडून मैदानातून स्टेडिअममध्ये नेण्यात आले. दरम्यान त्याने पोलिसांशी वादही घातला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगात धाडलं.

https://twitter.com/NaitikSingh28/status/1512846287083012096?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512846287083012096%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fzee-hindustan%2Fsports-news%2Fipl-2022-rohit-sharma-virat-kohli-fan-entered-in-ground-during-mi-vs-rcb-match-police-arrested-him%2F1148722

पोलिसांनी दाखल केला गुन्हा
तळेगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, “दशरथ जाधववर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४४७ आणि ३५३ (गुन्हेगारी अतिक्रमण) आणि ३५३ (लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी प्राणघातक हल्ला) अंतर्गत आरोप गुन्हा नोंदवण्यात आला.” त्याने पोलिसांशीही वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उभय संघांचे गुणतालिकेतील स्थान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या गुणतालिकेतील स्थानाबद्दल बोलायचं झालं, तर ते ४ सामन्यात ३ विजय आणि १ पराभव मिळवत ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात सलग ४ पराभव मिळवत शून्य गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

RR vs LSG: लखनऊचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; दोन्ही संघात २ महत्त्वाचे बदल

Video: सूर्यकुमारने करून दिली धोनीची आठवण! हेलिकॉप्टर शॉटने ठोकला तब्बल ९८ मीटरचा षटकार

सलामीवीरांची जोरदार सुरुवात, शार्दुलला सोबतीला घेत अक्षरची प्रॉपर फिनिशिंग; नावे केला ‘अष्टपैलू’ विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---