---Advertisement---

‘तुम्हाला तुमचा अहंकार विसरावा लागतो’, डोक्यावर ऑरेंज कॅप मिरवणाऱ्या बटलरची पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया

On: बुधवार, मे 25, 2022 10:46 PM
Jos-Buttler-IPL
---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएलच्या चालू हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धमाकेदार प्रदर्शन करणारा बटलर मागच्या काही सामन्यात मात्र अपयशी ठरत होता. पण गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर सामन्यात त्याला सूर पुन्हा सापडल्याचे दिसले. राजस्थानसाठी या सामन्यात त्याने महत्वाची खेळी केली असली, तरी संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. सामना संपल्यानंतर त्याने खास प्रतिक्रिया दिली.

गुजरात टायटन्सने ७ विकेट्स राखून क्वालिफायर १ सामना जिंकला आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. पराभव पत्करल्यानंतर जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला की, “मला टिकून खेळायचे होते. आमच्यासाठी हा मोठा सामना होता आणि मला मोठी धावसंख्या करायची होती. अनेकदा तुम्हाला स्वतःचा अहंकार विसरावा लागतो. जर अडचण येत आहे, तर येत आहे. मी जास्त चिंता नाही करत. विरोधी संघाची इच्छा आहे की, मी घाबरावे आणि विकेट गमवावी. मला स्वतःवर विश्वास होता आणि मला माहिती होते की, मी लय मिळवेल, जी या डावात थोडी उशिरा मिळाली.”

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने खेळपट्टीवर बटलरची चांगली साथ दिली. सॅमसनने दिलेल्या ४७ धावांच्या योगदानाविषयी बोलताना बटलर म्हणाला की, “सुरुवातीला अडचणी आल्या, पण संजूने येऊन ही खेळी केली. त्यामुळे माझ्यावरचा दबाव कमी झाला. मी टिकून खेळत राहिलो आणि शेवटी वेगाने धावा बनवल्या.”

बटलरने या सामन्यात ५६ चेंडूत ८९ धावा केल्या, यामध्ये १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. गुजरातने क्वालिफायर सामन्यात मात दिली असली, तरी अंतिम सामना गाठण्यासाठी राजस्थानकडे अजून एक संधी आहे. “आम्ही अजूनही स्पर्धेत कायम आहोत आणि आमच्याकडे एक संधीही आहे. आम्ही आज निराश आहोत, पण पुढच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करू.” असे बटलर पुढे बोलताना म्हणाला.

राजस्थानला क्वालिफायर एकमध्ये पराभव मिळाल्यानंतर आता राजस्थानचा संघ क्वालिफायर दोनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर किंवा लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील एका संघासोबत खेळायचे आहे. आरसीबी आणि लखनऊ एलिमिनेटर सामन्यात भिडणार आहेत. त्यांच्यातील जो संघ जिंकले, तो क्वालिफायर दोनमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत खेळताना दिसेल.

दरम्यान, राजस्थान आणि गुजरात यांच्यातील मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित २० षटकांमध्ये राजस्थानने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या फलंदाजांनी ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.३ षटकात हे लक्ष्य गाठले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

नाद नाद नादच! रजत पाटीदारने गाजवली आयपीएल, लखनऊविरुद्ध ४९ चेंडूत शतक ठोकत रचला भीमपराक्रम

विकेट मिळाली तरी निराश झाला राजस्थानचा ‘हा’ गोलंदाज, पाहा व्हिडिओ…

आयपीएल फायनलला अजून चार दिवस बाकी, मग काय करणार? पाहा गुजरातच्या ट्वीटवर काय म्हणाला राशिद खान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---