---Advertisement---

सचिनसोबत फोटो घेण्यासाठी चढाओढ! मुंबई इंडियन्सने शेअर केला राजस्थानच्या खेळाडूंचा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 9:54 PM
Sachin meeet
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ चा नववा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना शनिवारी (२ एप्रिल) नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्यापूर्वी मैदानात सराव करत आहेत. यादरम्यान संघातील खेळाडू आणि दिग्गज एकमेकांच्या भेटी देखील घेत आहेत. यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे युवा खेळाडू दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत फोटो घेताना पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक वर्ष आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता. सचिनने अनेक हंगामात मुंबईचे नेतृत्वही केले. आता तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या एडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. सचिनने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी मेंटॉरच्या रूपात अनेकदा संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो. आयपीएल २०२२ हंगामासाठीही तो सध्या मुंबईच्या कॅम्पमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू एकाच ठिकाणी सराव करत आहेत. अशात राजस्थानच्या युवा खेळाडूंना जेव्हा सचिन तेंडुलकर दिसला, तेव्हा त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह ते आवरू शकले नाहीत. या खेळाडूंना एकापाठोपाठ सचिनसोबत पोज दिली. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

https://www.instagram.com/tv/CbxR0oADVI0/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, शनिवारी (२ एप्रिल) आयपीएलमध्ये डबल हेडल सामने खेळले जाणार आहेत. डबल हेडरमधील पहिला सामना दुपारी ३.३० मिनिटांनी मुंबई आणि राजस्थान संघात सुरू होईल, तर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दुसरा सामना सायंकाळी ७.३० मिनिटांनी सुरू होईल. मुंबईचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव या सामन्यात संघात पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता.

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मात्र त्यांच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करून सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान संघाने चँपियन शेन वॉर्नची काढली आठवण, पदार्पणवीरांना डेब्यू कॅप देताना केली खास अपील (mahasports.in)

धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---