विजयाचं खातं उघडण्यासाठी पलटणला ‘मास्टर ब्लास्टर’कडून महत्त्वाच्या टिप्स, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

विजयाचं खातं उघडण्यासाठी पलटणला 'मास्टर ब्लास्टर'कडून महत्त्वाच्या टिप्स, मुंबई इंडियन्सने शेअर केला Video

सर्वाधिक वेळ आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल २०२२ ची सुरुवात अपेक्षित झाली नाही. पहिल्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता मुंबई इंडियन्स त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे, जो २ एप्रिल रोजी खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी झाला आहे.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने संघातील खेळाडूंना सरावासाठी रिलायंस कॉर्पोरेट पार्कमध्ये त्यांचा कॅम्प लावला आहे. दिल्ली कॅपिट्लसविरुद्धच्या सामन्याआधी संघातील खेळाडूंनी कॅम्पमध्ये कसून सराव केला आहे. यादरम्यान भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आगमन झाले. आयपीएल २०२२ मधील हे पहिले सराव सत्र होते, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर सपोर्ट स्टाफचा भाग म्हणून सहभागी झाला. सचिनने काही दिवसांपूर्वी कोरोना नियमावलीनुसार ठरावीक दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण केला आणि नंतर संघासोबत सहभागी झाला आहे.

मुंबई इंडियन्सला चालू आयपीएल हंगामातील त्यांचा दुसरा सामना २ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचा आहे, जो मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाईल. मंगळवारची (२९ मार्च) संपूर्ण दुपार सचिनने नेट्सवर घालवली. फलंदाजांच्या खेळीकडे त्याने लक्ष दिले. संघातील युवा खेळाडू तिलक वर्मा, डेवॉल्ड ब्रेविस आणि आर्यन जुयाल यांच्यासह वेळ घालवला. सचिनकडून या युवा खेळाडूंना वेगवेगळे शॉट, फुटवर्क आणि एकंदरीत फलंदाजीचे अनेक सल्ले मिळाले. फ्रेंचायझीने माहिती दिली आहे की, खेळाडूंनी नेट्सव्यतिरिक्त पुढच्या सामन्यासाठी क्षेत्ररक्षणाचाही सराव केला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ ची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाला होता.  रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून मुंबईचा पराभव केला होता. अशात संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुणतालिते पहिला स्वतःच्या नावापुढे शुभारंभ करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल. राजस्थानने त्यांच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ६१ धावांनी पराभूत केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

IPL2022| चेन्नई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

CSK vs LSG | केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही

कर्णधार डू प्लेसिसने कार्तिकला म्हटले धोनीसारखे ‘कूल’, उधळली स्तुतीसुमने; वाचा स्टेटमेंट

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.