रविंद्र जडेजा याच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. रविवारी (१७ एप्रिल) गुजरात टायटन्सने चेन्नईला ३ विकेट्स राखून पराभूत केले आहे. हा चेन्नईचा आयपीएल २०२२मधील पाचवा पराभव होता. गुजरातचा डेविड मिलर आणि प्रभारी कर्णधार राशिद खान यांच्या दमदार खेळींमुळे सामना चेन्नईच्या हातून निसटला. दरम्यान चेन्नईकडून शिवम दुबेने मोठी चूक केली, ज्यामुळे कर्णधार जडेजालाही लाईव्ह सामन्यात राग अनावर झाला होता.
दुबेने (Shivam Dube) या सामन्यादरम्यान मिलरचा सोपा झेल (Shivam Dube Miss David Miller Catch) सोडला. त्याच्या या एका चुकीमुळे मिलरला जीवनदान मिळाले आणि त्याने नाबाद ९४ धावा फटकावत संघाला विजयाच्या नजीक पोहोचवले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
गुजरातच्या डावातील १७व्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. गुजरातला यावेळी विजयासाठी २४ चेंडूंमध्ये ५२ धावांची आवश्यकता होती. ड्वेन ब्रावोने या षटकातील पहिल्या २ चेंडूंवर केवळ २ धावा दिल्या. त्यानंतर ब्रावोने (Dwyane Bravo) तिसऱ्या चेंडूवर आपली गती कमी केली आणि या चेंडूला मिलरने पुल केले. चेंडू मिडविकेटच्या दिशेने हवेत गेला आणि डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या दुबेकडे गेला. दुबेकडे हा सोपा झेल टिपण्याची नामी संधी होती.
परंतु चेंडू जवळ पोहोचताच दुबे जागीच थांबला आणि झेल टिपण्याऐवजी चेंडूने एक टप्पा घेतल्यानंतर त्याला पकडले. इतका सोपा झेल टिपण्यातही दुबेला अपयश आल्याचे पाहून गोलंदाज ब्रावो हताश झाला. समालोचकही त्याच्या या कृतीवर नि:शब्द होते. इतकेच नव्हे तर, कर्णधार जडेजालाही (Captain Ravindra Jadeja) त्याचा भरपूर राग आला. त्याने रागाच्या भरात (Ravindra Jadeja Angry On Shivam Dube) आपल्या डोक्यावरील टोपी काढून खाली आपटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्वरित त्याने स्वत:ला शांत केले आणि पुन्हा टोपी डोक्यावर घातली.
I feel for Jaddu 😞 #ShivamDube didn’t even attempt that one! But this ain’t as criminal as letting #vijayshankar be a part of the playing XI! @gujarat_titans what were you even thinking? #CSKvsGT pic.twitter.com/4X65j2mBLa
— SRH Fan (@kaarthikdas) April 17, 2022
https://twitter.com/cric_big_fan/status/1515742382150467589?s=20&t=WbmKHqzm7n3W9vx2VnKQnA
दुबेने हा झेल सोडला तेव्हा मिलर ४३ चेंडूंमध्ये ७९ धावांवर खेळत होता. या जीवनदानाचा फायदा घेत मिलरने पुढे नाबाद राहात ९४ धावा फटकावल्या. केवळ ५१ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही मॅच विनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावरच गुजरातने चेन्नईला चितपट केले. या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
थक गये है..! गुजरातविरुद्ध पराभूत झालेल्या सीएसकेवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, मीम्स व्हायरल
सामना गमावला, पण चेन्नईच्या कर्णधारानं केला खास कारनामा; रोहित अन् पंड्यालाही टाकलंय मागं