एक खेळाडू दूसऱ्या खेळाडूचा चाहता आहे असे आपण ऐकतो. परंतु एक कर्णधार दूसऱ्या कर्णधाराचा चाहता आहे, असे क्वचितच ऐकायला मिळते. इंडियन प्रीमियर लीग ही जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी सर्व फ्रॅंचायझींनी आपले कर्णधार निश्चीत केले आहेत. कोलकाता संघाने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर केएल राहूलला लखनऊ सुपर जायंट्स संघाने कर्णधार म्हणून घोषित केले आहे. श्रेयस स्वत: कर्णधार असतानाही तो एक विरुद्ध संघाच्या कर्णधाराचा चाहता आहे. त्याने केएल राहूलच्या खेळीचे कौतुक केले आहे.
श्रेयस अय्यर म्हणाला, “केएल राहुल सामन्याच्या परिस्थितीचा चांगल्याप्रकारे अंदाज घेतो आणि इतर खेळाडूंना त्यांच्या खेळानुसार समायोजित करण्यास मदत मिळते. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणे चांगले आहे. सर्वप्रथम तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो मैदानावर आणि संघासोबतच्या बैठकींमध्ये जो आत्मविश्वास दाखवतो, तो खेळाडूंना समर्थन प्रदान करतो, हे खूपच चांगले आहे. तो खुप शांत स्वभावाचा आहे आणि त्याच्यासाठी मैदानात निर्णय घेणे खुप सोपे आहे. मला त्याच्यासोबत खेळून आनंद झाला.”
केकेआरचा कर्णधार अय्यर म्हणाला की, त्याला राहुलला कर्णधार म्हणून पाहायला आवडते. कारण त्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी दिली होती. त्याने ३ षटकांत २१ धावा दिल्या होत्या. श्रेयस म्हणाला, “राहुलने मला तीन षटकांत गोलंदाजी करण्याची संधी दिली होती, जी या अगोदर कोणत्याच कर्णधाराने केली नाही. त्यामुळे तो माझा आवडता कर्णधार आहे.”
आयपीएलचा पहिला सामना केकेआर आणि सीएसके या दोन संघांमध्ये २६ मार्चला खेळला जाणार आहे. केकेआर संघ २०२१ च्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु सीएसकेने आयपीएल ट्राॅफी जिंकली होती. श्रेयस अय्यर यापुर्वी दिल्ली संघाचा भाग होता, यावर्षी केकेआरने १२.१५ कोटींना त्याला विकत घेतले आहे.
कोलकाता नाईट रायटर्स संघ-
आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायन, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंह, अनुकूल रॉय, रसिख डार, बाबा इंद्रजीत, चामिका करुणारत्ने, अभिजीत तोमर, प्रथम सिंह, अशोक शर्मा, सैम बिलिंग्स, आरोन फिंच, टिम साउदी, रमेश कुमार, मोहम्मद नबी, उमेश यादव, अमन खान.
महत्त्वाच्या बातम्या-
अष्टपैलू म्हणजे विजयाची गॅरंटी! लखनऊ आणि चेन्नईकडे भरमार, पण ‘या’ संघांकडे मर्यादित पर्याय
‘मी अजून वाट पाहू शकत नाही’, जुन्या सहकाऱ्यासोबत पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे कमिन्स
सोळा तास मैदानावर घालवले.. ६७३ चेंडू खेळला.. विंडीज कर्णधार ब्रेथवेटने मोडला १८ वर्षे जुना विक्रम