जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंचा समावेश होतो. यामध्ये विराट कोहलीचे नाव अग्रस्थानी घेतलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, २०१९ नंतर त्याचा फॉर्म खालावत गेल्याचे दिसत आहे. अशात त्याला ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने त्याला नैसर्गिक खेळाशी जोडले राहण्याचा सल्ला दिला आहे. मागील सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध ५३ चेंडूत ५८ धावांची खेळी करण्यापूर्वी विराटला खास कामगिरी करता आली नव्हती. या अर्धशतकानंतरही विराटला अजून खास कामगिरी करत राहणे आवश्यक आहे. अशात स्वत: काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या वॉर्नरने विराटला आयुष्य आणि क्रिकेटचा आनंद घेण्यास आणि मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला आहे.
डेविड वॉर्नरने (David Warner) एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, “विराट कोहलीने (Virat Kohli) आणखी मुलांना जन्म दिला पाहिजे आणि प्रेमाचा आनंद लुटला पाहिजे. फॉर्म येतो आणि जातो. मात्र, योग्यता ही कायमस्वरुपी असते. तुम्ही ही कधीही गमावत नाही. असे जगातील प्रत्येक खेळाडूसोबत होते.”
“तुम्ही किती चांगले खेळाडू आहात याने काही फरक पडत नाही, तुम्हाला नेहमी फॉर्मशी संबंधित दोन-चार समस्या येत असतात. कधी कधी वाईट काळाची साखळी दीर्घकाळ चालते. अशा परिस्थितीत, खेळाच्या मूलभूत गोष्टींना चिकटून राहणे महत्त्वाचे आहे,” असेही वॉर्नर पुढे बोलताना म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विराटच्या आयपीएल २०२२मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २१.६०च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त आणि फक्त १ अर्धशतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, त्याच्यावर २ वेळा शून्य धावेवर बाद होण्याची नामुष्की ओढवली आहे.
विराटची आयपीएल कारकीर्द
विराट कोहलीच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २१८ सामन्यांतील २१० डावांमध्ये फलंदाजी करताना ३६.५१च्या सरासरीने ६४९९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ४३ अर्धशतके झळकावले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर