इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा १५ वा हंगाम दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालला आहे. शुक्रवारी (१५ एप्रिल) हंगामातील २५ व्या सामन्यात सनराझर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सला ७ विकेट्स राखून पराभवाची धूळ चारली. हैदराबादने मिळवलेला हा सलग तिसरा विजय ठरला. केकेआरचा अष्टपैलू आंद्रे रसल अवघी एक धावा कमी पडल्यामुळे स्वतःचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. असे असले तरी, रसलने त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात ४९ धावा करून नाबाद राहिला. या धावा करण्यासाठी त्याने २५ चेंडू खेळत ४ चौकार आणि ४ षटकारांची मदत घेतली. तसेच गोलंदाजी करत असताना २ विकेट्सही नावावर केल्या. दरम्यान, ही पहिली वेळ नाहीय, जेव्हा रसल अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एक धाव कमी असताना तंबूत परतला आहे. त्याच्यासोबत असे होण्याची ही तिसरी वेळ आहे. या बाबतीत त्याने भारतीय दिग्गज युसूफ पठाणला मागे सोडले आहे. युसूफ पठाण (Yusuf Pathan) सोबत असा प्रकार २ वेळा झाला आहे.
दरम्यान, उभय संघातील या सामन्यावर नजर टाकली, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ८ विकेट्सच्या नुकसानावर १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात जेव्हा हैदराबादची फलंदाजी आली, तेव्हा त्यांनी हे लक्ष्य अवघ्या १७.५ षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले. परिणामी केकेआरला ७ विकेट्सने हार पत्करावी लागली.
केकेआरसाठी मध्यक्रमातील फलंदाज नितीश राणाने ३६ चेंडूत सर्वाधिक ५४ धावांचे योगदान दिले. आंद्रे रसेल ४९ धावांसह केकेआरसाठी दुसरा सर्वात जास्त धावांचे योगदान देणारा फलंदाज ठरला. त्याव्यातिरिक्त केकेआरचा एकही फलंदाज ३० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. हैदराबादसाठी टी नटराजनने ३ आणि उमरान मलिकने २ विकेट्स घेतल्या.
हैदराबादसाठी राहुल त्रिपाठीने अवघ्या ३७ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. तसेच एडम मार्करमने ३६ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली. गोलंदाजीत आंद्रे रसेलला २, तर पॅट कमिन्सला एक विकेट मिळाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘खूप थकल्यासारखं वाटतंय’, श्रेयस अय्यरने हैदराबादविरुद्धच्या पराभवामागील कारण केले स्पष्ट
IPL 2022| दिल्ली वि. बेंगलोर सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
Video: तोडफोड फलंदाजी! नितीश राणाच्या जबरदस्त शॉटने तोडली हैदराबादच्या डगआऊटमधील फ्रीजची काच