मंगळवारी (२९ मार्च) आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने-सामने होते. राजस्थानने या सामन्यात हैदराबादला ६१ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले. या सामन्यात राजस्थानने मिळालेल्या विजायपेक्षा जास्त सनरायझर्स हैदराबादची मालकिण काव्या मारनची झाली. काव्या मारन अनेकदा तिच्या संघाचा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित असते आणि तिचे चाहतेही मोठ्या प्रामाणात आहेत. चालू हंगामातील हैदराबादच्या पहिल्या सामन्यातही काव्या पुन्हा एकदा चर्चेत आली.
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांचा हा आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील पहिला सामना होता. हैदराबादचा गोलंदाज रोमारियो शेफर्डने राजस्थानच्या डावाच्या सातव्या षटकात सलामीवीर यशस्वी जयस्वालाची विकेट घेतली. शेफर्डने ही विकेट घेताच, कॉमेरामॅनने हैदराबात फ्रेंचायझीची मालकिण काव्या मारन (Kaviya Maran) हिच्याकडे कॅमेरा केला आणि तिची रिएक्शन कॅमेऱ्यात कैद झाली. विकेटे मिळताच काव्या खुर्चीतून उठली आणि चेहऱ्यावर एका स्मित हास्यासह टाळ्या वाजवू लागली.
सामना सुरू होण्याआधीपासून केन विलियम्सनच्या नेतृत्वातील सनरायझर्स हैदराबाद संघापेक्षा त्यांची मालकिण काव्या मारनची चर्चा अधिक होत होती. चाहते तिला स्टेडियममध्ये पाहण्यासाठी आतूर होते. अशात कॅमेरामॅनने जेव्हा तिच्याकडे कॅमेरा फिरवला, काव्याच्या रिएक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
The biggest reason for many to watch today's match! #KaviyaMaran 😍😍
.#SRHvsRR #IPL2022 pic.twitter.com/eW28n1p5Jv— NK (Modi ka Parivar) 🇮🇳 (@nirmal_indian) March 29, 2022
If someone ask me why SRH should win today the first reason i say
Make her happy 🧡🧡🧡😊🤗😍@SunRisers @fc_sunrisers @OrangeArmyFans #kaviyamaran pic.twitter.com/ng96kMO1ZK
— Harish Kumar Matlapudi (@MatlapudiHarish) March 29, 2022
राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलर सुरुवातीला वेगात धावा करत होता. त्याने संघाला एक चांगली सुरुवात दिली, पण युवा उमरान मलिकने त्याची विकेट घेऊन राजस्थानच्या धावफलकावर काही प्रमाणात अंकुश लावण्याचे काम केले. पण नंतर राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच देवदत्त पडिक्कलने ४१ धावांचे महत्वाचे योगदान दिले.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघ २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर अवघ्या १४९ धावा करू शकला. परिणामी सामन्यात त्यांचा संघ ६१ धावांनी पराभूत झाला.
महत्वाच्या बातम्या –
राजस्थानविरुद्धच्या पराभवासोबतच हैदराबादच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद; वाचा सविस्तर
अर्रर्र! विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ४०० कोटींची घसरण, तर ‘माही’ने घेतली मोठी झेप