पुणे। इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामाला शानदार सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या चारही सामन्यात रोमांच पाहायला मिळाला. आता मंगळवारी (२९ मार्च) या हंगामातील पाचवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. या हंगामात सनरायझर्स हैदराबाद ब गटात आहे, तर राजस्थान अ गटात आहे. त्यामुळे या हंगामातील साखळी फेरीत या दोन संघात हा एकमेव सामना होणार आहे.
अंतिम ११ जणांच्या संघात या खेळाडूंना मिळू शकते संधी
या हंगामापूर्वी मेगा लिलाव झाला असल्याने सर्व संघ जवळपास नव्याने बांधण्यात आले आहेत. असे असले तरी हैदराबाद आणि राजस्थान (Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals) या संघांनी त्यांचे मागील हंगामातील त्यांचे कर्णधार संघात कायम केले होते. त्यामुळे यंदा देखील केन विलियम्सन (Kane Williamson) हैदराबादचे आणि संजू सॅमसन (Sanju Samoson) राजस्थानचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
राजस्थानच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर जोस बटलरसह देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतो आणि यंदा यशस्वी जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. याशिवाय मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार सॅमसनसह शिमरॉन हेटमायरवर असू शकते, तर अष्टपैलू म्हणून रियान परागसह जिमी निशाम किंवा नॅथन कुल्टर-नाईलला संधी मिळू शकते. तसेच राजस्थानकडे आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा असे अनुभवी गोलंदाजांची फौज आहे.
हैदराबादच्या संभावित ११ जणांच्या संघाबाबत बोलायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करमबरोबर भारताचा युवा अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजी करू शकतो. तसेच मधली फळी कर्णधार केन विलियम्सनसह राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, अब्दुल सामद हे सांभाळू शकतात, तर वॉशिंग्टन सुंदर आणि रोमरियो शेफर्ड यांना अष्टपैलू कामगिरी करावी लागेल. याशिवाय गोलंदाजीत उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन हे गोलंदाजीची जबाबदारी घेऊ शकतात.
आमने-सामने कामगिरी
मंगळवारी राजस्थान आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) आपल्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून करणार आहेत. या दोन संघांमध्ये आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५ सामने झाले आहेत. यातील ८ सामने हैदराबादने आणि ७ सामने राजस्थानने जिंकले आहेत.
हवामान आणि खेळपट्टी
हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी खेळला जाणार आहे. त्यामुळे वातावरण थंड असेल. तसेच या मैदानावरील खेळपट्टीवर चेंडूला टर्न मिळतो, पण तरीही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच अन्य मैदानांप्रमाणेच या मैदानावरही दव महत्त्वाचा घटक ठरू शकतो. या सामन्यादरम्यान २५ डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे. तसेच ताशी ४० किमी वेगाने वारा वाहू शकतो.
आयपीएल २०२२ हंगामातील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना २९ मार्च २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
सनरायझर्स हैदराबाद: राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विलियम्सन (कर्णधार), निकोलस पूरन (यष्टीरक्ष), एडेन मार्करम, अब्दुल सामद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, मार्को यान्सिन, रविकुमार समर्थ, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिथ, ग्लेन फिलिप्स, शशांक सिंग, विष्णू विनोद, प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, फजलहक फारुकी, सौरभ दुबे
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेम्स नीशम, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, नॅथन कुल्टर-नाईल, करुण नायर, रॅसी वॅन डर डसेन, डॅरिल मिशेल, ओबेद मॅकॉय, तेजस बारोका, कुलदीप यादव, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने ३ वर्ष आधीच केली होती…
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सला जेतेपद जिंकून देणारा ‘स्वप्निल असनोडकर’
IPL 2022 | एक ‘गावकरी’ आणि एक ‘नावकरी’, दोघांनी मिळून KL राहुलच्या स्वप्नांना लावला सुरुंग