गुरुवारी (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्जचा युवा अष्टपैलू शिवम दुबेने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १९ व्या षटकात २५ धावा खर्च केल्या आणि परिणामी सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला. अशात पराभवाचे खापर शिवम दुबेवर फुटत आहे. परंतु सीएकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगच्या मते १९ वे षटक शिवम दुबेला देणे, हा संघाने घेतलेला योग्य निर्णय होता.
सीएसके आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न्स स्टेडियमवर खेळला गेला. परंतु या स्टेडियमवर दव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चेंडू गोलंदाजांना हातात व्यवस्थित पकडता येत नसल्याचे दिसले. याच कारणास्तव सीएसकेचे फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांनी कमी षटके टाकली आणि याच कारणास्तव दबावाच्या परिस्थिती शिवम दुबे (Shivam Dube) याला गोलंदाजी करावी लागली.
लखनऊला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत ३४ धावांची आवश्यकता होती. १९ व्या षटकात दुबेने २५ धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या षटकात त्यांना ९ धावांची गरज होती. लखनऊच्या फलंदाजांनी तीन चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
सामना संपल्यानंतर सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) म्हणाले की, “त्यांनी मैदानात हा निर्णय घेतला की, एखाद्या फिरकी गोलंदाजाऐवजी दुबेला चेंडू सोपवावा आणि हा योग्य निर्णय होता.”
स्टिफन पुढे बोलताना म्हणाले की, “जर तुम्ही आधीची परिस्थिती पाहिली, तर फिरकी गोलंदाजांना आजमावले जाऊ शकत नव्हते, कारण जिथपर्यंत मैदानातील दवाचा प्रश्न आहे, तर ते नियाग्रा वॉटरफॉलप्रमाणे होते. दव खूप पडत होते आणि अशात फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड बनवणे खूप अवघड होत होते. अशा परिस्थितीत प्रभाव पाडणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.”
“आम्ही आधीच त्यांच्याकडून (फिरकी गोलंदाज) एक- एक षटक कमी करून घेतले होते, पण त्यांनी चांगले प्रदर्शन केले. आम्हाला माहिती होते आम्हाला मध्ये कुठेतरी हे षटक पूर्ण करावे लागणार आहे. आम्हाला अशी अपेक्षा होती की, शेवटच्या षटकांमध्ये आमच्याकडे पुरेशा धावा असतील आणि आम्ही एखाद्याकडून हे षटक करून घेऊ.” असे फ्लेमिंग पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून लखनऊने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊने १९.३ षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. लखनऊला विजयी करण्यासाठी वेस्ट इंडीजचा एविन लुईस (५५) आणि युवा आयुष बदोनी (१९) यांची झटपट खेळी महत्वाची ठरली.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या सुरुवातीलाच गंटागळ्या खाणाऱ्या सीएसकेबद्दल ऑसी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला…
धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की
IPL2022| कोलकाता वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!