---Advertisement---

IPL 2022| चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर ‘मिस्टर आयपीएल’ चर्चेत; रैनाच्या पुनरामनाची होतेय मागणी

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाची सुरुवात शानदार झाली असून या लीगमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. परंतु, चेन्नई सुपर किंग्ससाठी हंगामाची सुरुवात चांगली झालेली दिसत नाही. संघाला पहिल्या तिन्ही सामन्यात अपयश आले आहे. पंजाबविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सीएसकेला ५४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. यानंतर सोशल मीडियावर सध्या सुरेश रैना प्रचंड चर्चेत आहे. त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन करावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. 

सीएसकेच्या खराब खेळीनंतर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एमएस धोनीने आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवात होण्यापूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि रविंद्र जडेजाला संघाचा कर्णधार बनवले आहे. रविंद्र जडेजाने कर्णधार म्हणून अजूनही काही खास कामगिरी केली नाही. तसेच ऋतुराज गायकवाड देखील तिन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे.

दरम्यान, सुरेश रैनाला (Suresh Raina) आयपीएल २०२२ हंगामाच्या मेगा लिलावापूर्वी (IPL 2022 Mega Auction) सीएसकेने रिलीज केले होते. तसेच त्याच्यावर लिलावात कोणत्याच फ्रॅंचायझीने बोली लावली नाही, त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. पहिल्यांदाच असे झाले आहे की, रैनाला लिलावात कोणीच खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे आता सुरेश रैना आयपीएल २०२२ मध्ये समालोचक म्हणून दिसत आहे.

चेन्नईच्या तिसऱ्या पराभवानंतर सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, रैनाला त्याच्या फलंदाजीसाठी नाही, तर लकी चार्मसाठी त्याच्या मुळ किमतीत खरेदी करायला हवे. चाहत्यांच्या मते, सीएसकेसाठी रैनाचे संघात असणे भाग्यशाली आहे. त्यामुळे चेन्नईने रैनाला पुन्हा संघात खरेदी करावे, जेणेकरुन संघ या लीगमध्ये पुनरागमन करु शकेल.

https://twitter.com/sahi_bolta_hu/status/1510883219385696256

https://twitter.com/Yashthakar664/status/1510884810700427264

https://twitter.com/ChitvanSawhney/status/1510882909900587018

https://twitter.com/ImGunjan_Sinha/status/1510880422917722115

https://twitter.com/Im_RishRo1745/status/1510879809320398849

https://twitter.com/RajShuk13702794/status/1510878798832549891

सुरेश रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २०५ सामन्यांत ५५२८ धावा केल्या आहेत, यामध्ये एका शतकाचा आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.

सीएसके संघ पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ६ विकेट्सने पराभूत झाला, तर दूसऱ्या सामन्यात संघाला लखनऊ सुपर जायंट्सने ६ विकेट्सने पराभूत केले. पंजाबविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकात ८ विकेट्स गमावत १८० धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ६० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसके संघ १८ षटकांतच १२६ धावा करत सर्वबाद झाला आणि हा सामना पंजाबने ५४ धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---