इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामाचा १८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांमध्ये पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये शनिवारी (९एप्रिल) खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने मुंबईला ७ विकेट्सने पराभूत केले. मुंबईला या सामन्यात अपयश आले असले, तरी संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने संघाला १५० धावा करुन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्याने या सामन्यात एमएस धोनीसारखा हेलिकाॅप्टर शाॅट मारला, ज्यामुळे तो खूप चर्चेत राहिला.
मुंबईच्या फलंदाजी दरम्यान सूर्यकुमार यादवने हेलिकाॅप्टर शाॅट लगावला, जो धोनीसारखा होता. मोहम्मद सीराजच्या चेंडूवर खेळलेला हा षटकार ९८ मीटर लांब गेला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनी हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखला जातो.
Surya's Double delightful sixes on IPL 2021: https://t.co/jBp6DmdgRh
— jasmeet (@jasmeet047) April 9, 2022
सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत दुखापत झाली होती, त्यानंतर तो आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. त्यानंतर तो केकेआरविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. सूर्यकुमार सलग चांगल्या खेळी खेळताना दिसत आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या दोनही आयपीएल सामन्यात अर्धशतक लगावले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ३६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकांरांच्या मदतीने ५२ धावा केल्या, तर त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ३७ चेंडूत ५ चौकारांच्या आणि ६ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या.
सूर्यकुमारने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ११७ सामन्यांत ३०.१ च्या सरासरीने २४६१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १५ अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३६ आहे. त्याने भारतीय संघासाठी सुद्धा दमदार कामगिरी केली आहे. त्याला आयपीएल लिलावापूर्वी मुंबई फ्रॅंचायझीने संघात रिटेन केले होते, तसेच मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्डला देखील रिटेन केले होते.
मुंबई संघ यावेळी सर्वच सामन्यांत अपयशी ठरला आहे. संघाने यावर्षी ४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाला अपयश आले आहे. मुंबई आयपीएल इतिहासात ५ वेळा विजेतेपद पटकवणारा एकमेव संघ आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वडिल सायकलपटू, पण मुलगा बनला क्रिकेटर; आता थेट मुंबई इंडियन्सकडून केले आयपीएल पदार्पण
IPL2022| राजस्थान वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!