इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे (IPL 2022) बिगूल वाजले असून या हंगामाचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. हा हंगाम २६ मार्च ते २९ मे दरम्यान खेळवला जाणार आहे. मात्र काही मोठे खेळाडू या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. यामध्ये डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि जॉनी बेयरस्टो यांसारख्या परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आपल्या देशांकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात व्यस्त (Busy In International Matches) असल्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार (Cricketers To Miss IPL Opening Matches) आहेत.
मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पाकिस्तानविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका खेळण्यात व्यस्त असतील. त्यामुळे हे खेळाडू १२ एप्रिलला आपापल्या आयपीएल फ्रँचायझीत सामील होऊ शकतात. त्यामुळे हे खेळाडू जवळपास सुरुवातीच्या ४ आयपीएल सामन्यांना मुकू शकतात. ऑस्ट्रेलियाचे डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोयनिस हे १२ एप्रिलपासून आयपीएल सामने खेळू शकतात.
ऑस्ट्रेलियाबरोबरच इंग्लंड संघाचे जॉनी बेयरस्टो आणि मार्क वुड आयपीएलच्या सुरुवातीच्या २ सामन्यांमधून बाहेर असतील. तर वेस्ट इंडिजचे जेसन होल्डर आणि अल्जारी जोसेफ हे सुद्धा पहिल्या २ सामन्यांमध्ये अनुपलब्ध असतील. तसेच दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू ३१ मार्च ते १२ एप्रिलदरम्यान बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानात कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यामुळे कागिसो रबाडा, एडम मार्करमसारखे खेळाडू जवळपास अर्धा हंगाम आयपीएलपासून दूर राहतील.
आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणारे खेळाडू (खेळाडूंची नावे व त्यांचे संघ)
ग्लेन मॅक्सवेल- रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
डेविड वार्नर- दिल्ली कैपिटल्स
पॅट कमिंस- कोलकाता नाइट राइडर्स
जोश हेजलवुड- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
मॅथ्यू वेड- गुजरात टायटन्स
मार्कस स्टोयनिस- लखनऊ सुपर जायंट्स
मिशेल मार्श- दिल्ली कॅपिटल्स
सीन एबॉट- सनराइजर्स हैदराबाद
जेसन बेहरेनडॉर्फ- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
नाथन एलिस- पंजाब किंग्स
जॉनी बेयरस्टो- पंजाब किंग्स
मार्क वुड- लखनऊ सुपर जायंट्स
जेसन होल्डर- लखनऊ सुपर जायंट्स
अल्जारी जोसेफ- गुजरात टायटन्स
एडम मार्करम- सनराइजर्स हैदराबाद
कगिसो रबाडा- पंजाब किंग्स
मार्को जेन्सन- सनराइजर्स हैदराबाद
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’चे ट्विटर अकाऊंट हॅक? रोहितच्या विचित्र ट्वीट्सची मालिका पाहून चाहते गोंधळले
‘टीव्हीवर माझं नाव दिसत होतं आणि…’, केकेआरचा नवा कर्णधार श्रेयसने सांगितल्या मेगा लिलावातील भावना
महिला विश्वचषक ते आयपीएल २०२२, मार्च महिना क्रिकेटप्रेमींसाठी ठरणार आहे पर्वणी