मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही बलाढ्य संघांसाठी चालू आयपीएल हंगाम आतापर्यंत चांगला गेलेला नाहीये. मुंबईने हंगामातील सुरुवातचे सगल ६ सामने गमावले आहेत, तर चेन्नईने सुरुवातीच्या ६ सामन्यांपैकी फक्त एक जिंकला आहे. गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमने- सामने होते.
हे देन्ही संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ राहिले आहेत, पण चालू हंगामात मात्र चित्र वेगळे दिसत आहे. गुरुवारच्या सामन्यात मुंबई त्यांच्या पहिला विजायच्या शोधात असेल, तर सीएसके त्यांच्या दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघातील काही खेळाडू असे आहेत, जे या हंगामात स्वतःच्या नावार खास विक्रमाची नोंद करू शकतात. चला तर नजर टाकूया या खेळाडूंवर.
१. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)
सीएसकेचा सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाच्या नावावर आयपीएलमध्ये ४९१९ धावा आहेत. जर उथप्पा मुंबईविरुद्ध चांगले प्रदर्शन करत ८१ धावा करू शकला, तर तो स्वतःच्या ५००० आयपीएल धावा करू शकतो. यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन आणि डेविड वॉर्नर यांनी आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा पार केला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नावावर सध्या १३२ आयपीएल विकेट्सची नोंद आहे. जर मुंबईविरुद्ध त्याने ३ विकेट्स घेतल्या, तर कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह यांच्या १३४ विकेट्सचा विक्रम तो मोडू शकतो. परंतु बुमराह या सामन्यात किती विकेट्स घेतो, हे देखील पाहावे लागणार आहे. फलंदाजीत जडेजाने जर ४ धावा केल्या, तर तो शॉन मार्शच्या २४७७ धावांचा विक्रम मोडू शकतो. सध्या त्याच्या नावावर २४७४ आयपीएल धावा आहेत.
३. इशान किशन (Ishan Kishan)
मुंबईचा सलामीवीर फलंदाज इशान किशनकडे देखील सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. इशानने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४३ चौकार मारले आहेत. सीएसकेविरुद्ध जर त्याने ७ चौकार मारले, तर आयपीएलमध्ये १५० चौकार पूर्ण करेल. मात्र, त्याला ही कामगिरी करता आली नाही. तो शून्य धावेवर तंबूत परतला.
४. मोईन अली (Moeen Ali)
सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अली गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांंमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात जर मोईनने ४ षटकार मारू शकला, तर आयपीएल कारकिर्दीतील त्याचे ५० षटकार पूर्ण करू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या सगल ६ पराभवांना ‘हा’ खेळाडू जबाबदार; माजी दिग्गजाने साधला निशाणा
कर्णधार मयंकने ‘या’ ३ सुधारणा केल्या तरंच बरं, नाहीतर पंजाब संघ होऊ शकतो प्लेऑफमधून बाहेर