इंडियन सुपर लीग २०२२ स्पर्धेला येत्या चार दिवसात म्हणजेच २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १५ वा हंगाम असणार आहे. दरम्यान, आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेतील सामन्यांसाठीच्या तिकीट विक्रीला अद्याप सुरुवात झाली नव्हती. मात्र, आता याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२२ मधील सामन्यांसाठी २३ मार्चपासून तिकीट विक्री सुरू होणार आहे.
ऑनलाईन होणार तिकीट विक्री
आयपीएलच्या १५ व्या हंगामातील (IPL 2022) सामन्यांसाठी जी तिकीट विक्री (IPL Ticket Sale) होणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमधील सामन्यांसाठी बुधवारपासून तिकीटविक्री सुरू होईल.
खरंतर पहिल्या सामन्यासाठी दोन आठवड्यापूर्वी तिकीट विक्रीला सुरुवात होत असते. मात्र, कोविड-१९ च्या अलर्टमुळे स्टेडियममधील प्रेक्षकांच्या क्षमतेबद्दल साशंकता असल्याने तिकीट विक्री सुरू करण्यास उशीर झाला. स्टेडियमधील प्रेक्षक संख्येबाबत बीसीसीआय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान चर्चा सुरू आहे.
𝗧𝗵𝗲 𝘄𝗮𝗶𝘁 𝗶𝘀 𝗼𝘃𝗲𝗿 👏 👏
Tickets for #TATAIPL 2022 will be 𝗟𝗜𝗩𝗘 from 12PM IST onwards today 👍 👍
Go grab your tickets 🎫 🎫 – See you at the stands! 🏟️ 📣
Details below 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2022
सध्यातरी महाराष्ट्र सरकारने स्टेडियममध्ये आसन क्षमतेच्या केवळ २५ टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. पण बीसीसीआयची इच्छा आहे की, कमीतकमी ४० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी. दरम्यान, ही चर्चा सुरू असल्याने पहिल्या आठवड्यात तरी २५ टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता दाट आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार २५ टक्क्यांमधील काही तिकीटे बीसीसीआयला मुंबई क्रिकेट असोसिशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, व्यावसायिक भागीदार व प्रायोजक आणि सरकारी अधिकारी यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे सामन्य नागरिकांसाठी केवळ १० टक्के तिकीटे उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुण्यात आयपीएल सामने
आयपीएलमधील साखळी फेरीतील ७० सामने मुंबई आणि पुणे येथील ४ स्टेडियमवर होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम या मैदानांवर सामने होणार आहेत, तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे सामने होणार आहेत.
आयपीएल २०२२ मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या गतविजेत्या आणि गतउपविजेत्या संघात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
या ४ कारणांमुळे २००३ विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
मोठी बातमी! वयाच्या २५ व्या वर्षीच ऍश्ले बार्टीचा टेनिसला गुडबाय, जागतिक क्रमवारीत होती अव्वल
आठवणीतील सामना: भारतीय संघ १९ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत