आयपीएल २०२२ हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-२० मालिका खेळायची आहे. मायदेशातील या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अशात आयपीएलच्या चालू हंगामात ज्या युवा खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले आहे, त्यांना भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत (South Africa Tour of India 2022) ज्या खेळाडूंनी पदार्पणची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik), तिलक वर्मा (Tilak Verma) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांच्या समावेश आहे. या तिघांनीही स्वतःच्या संघासाठी चालू हंगामात कौतुकास्पद कामगिरी करून दाखवली आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती दिली जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.
मुळचा जम्मू कश्मीरचा असलेला उमरान मलिक आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळत आहे. मागच्या हंगामात संघाने या गोलंदाजाची गुणवत्ता लक्षात घेतली आणि आयपीएल २०२२ साठी रिटेन देखील केले. उमरान देखील चालू हंगामात संघाने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरला आहे. त्याने १५७ किमी ताशी वेगाने टाकलेला चेंडू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. काही सामन्यांमध्ये तो संघाला महागात जरी पडला असला, तरी त्याच्या चेंडूचा वेग पाहता त्याला पदार्पणाची नक्कीच संधी मिळू शकते.
मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्माने त्याच्या प्रदर्शनाने सर्वांनाच हैराण केले. चालू हंगामात मुंबई इंडियन्स सर्वात खराब प्रदर्शन करणारा संघ ठरला आहे, पण तिलक वर्माने मात्र हा हंगाम गाजवला आहे. त्याने या हंगामातील १२ सामन्यांमध्ये जवळपास ४१ च्या सरासरीने आणि १३२ च्या स्ट्राईक रेटने ३६८ धावा केल्या आहेत. तसेच पंजाब किंग्जच्या अर्शदीप सिंगनेही चालू हंगामात सर्वांचे लक्ष वेधले. शेवटच्या षटकांमध्ये तो किफायशीर गोलंदाजी करताना दिसला आहे. १२ सामन्यांमध्ये त्याने ८ पेक्षा कमी इकोनॉमी रेटने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नशीबच फुटकं! रहाणे दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधून बाहेर, टीम इंडियातील पुनरागमनही कठीण
लढवय्या रहाणे! प्रचंड वेदनेनंतरही संघासाठी खेळला, अजिंक्यची ‘ही’ बाजूही कौतुकास्पदच
ब्रेकिंग! पुण्यात होणाऱ्या महिला आयपीएलसाठी तीन संघांतील खेळाडूंची घोषणा, ‘या’ तिघींकडे कर्णधारपद