आयपीएल २०२२ ची सुरुवात शनिवारी (२६ मार्च) झाली. या हंगामातील तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज हे आमने-सामने होते. या सामन्यात आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघांना नवीन नेतृत्व लाभले होते. दक्षिण आफ्रिकन दिग्गज फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीला मयंक अगरवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने धूळ चारली. आरसीबीने सामन्यात मोठी धावसंख्या केली असूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. याच पार्श्वभूमीवर नेटकरी आरसीबीला सोशल मीडियावर ट्रोल करू लागले आहेत.
आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीचा इतिहास पाहिला, तर त्यांना आद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाहीय. आरसीबीने अनेकदा आयपीएलच्या सामन्यांमध्ये विक्रमी धावसंख्या उभारली, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यातही तसेच काहीसे दिसले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २ विकेट्सच्या नुकसानावर २०५ धावा केल्या. परंतु गोलंदाजी त्यांचा संघ पुन्हा एकदा फसला.
पंजाब किंगच्या फलंदाजांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि ६ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. पंजाब किंग्जने ५ विकेट्सच्या नुकसानावर २०८ धावा केल्या. आरसीबीच्या या निराशाजनक पराभवानंतर नेटकरी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
RCB known for these things!!#IPL #RCBvPBKS
— shruti raj (@shrutiraj228) March 27, 2022
https://twitter.com/JohnnyB48328877/status/1508141405608181762?s=20&t=7kNtG3UZ1Bp18ZgHdEflqQ
#RCBvPBKS vintage RCB.#FafDuPlessis talking to Virat, How they couldn't defend 205 Runs
Virat: pic.twitter.com/cRRSrwHJaA
— Srikant Reddy (@Srikantreddy_) March 27, 2022
Me after seeing punjab chasing 205 easily in 19 overs. #RCBvPBKS pic.twitter.com/cEcL6NqNUR
— Jr. Ra_Bies 2.0 (@Thesindhichokro) March 27, 2022
https://twitter.com/Rofl__Rockstar/status/1508139346519465988?s=20&t=7kNtG3UZ1Bp18ZgHdEflqQ
RCB Bowlers Vs Odean Smith😁😂#IPL2022 #RCBvPBKS pic.twitter.com/6vwwfQbQQW
— Vibintha Abishek (@Vibi_Abishek) March 27, 2022
Year Change, Team Change, Captain Change , Virat In Form, Captian Score 88 run, Scored 205 Vs PBKS
Fir Bhi :-#RCBvPBKS #FafDuPlessis #ViratKohli𓃵 pic.twitter.com/HtuVhMZOhE— जेंटल मैन (@gentleman07_) March 27, 2022
Just RCB things 😹😆😭😭 #RCBvPBKS pic.twitter.com/YrEXSiohKg
— Mahicasm (@ItsMahicasm) March 27, 2022
After #RCBvPBKS match – pic.twitter.com/M0AgXNTFbz
— Justsaying (@WhyJustsaying) March 28, 2022
सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने उत्कृष्ट प्रदर्शन केले. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि युवा अनुज रावत सलामीसाठी आले. डू प्लेसिसने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली, तर रावतने २१ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळपट्टीवर आला आणि त्याने ४१ धावा ठोकल्या. यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटेकेबाजी करत ३२ धावा केल्या. विराटने डू प्लेसिस आणि कार्तिक या दोघांसोबत चांगली भागीदारी पार पाडली.
प्रत्युत्तरात पंजाब किंग्जसाठी त्यांच्या प्रत्येक फलंदाजाने योगदान दिले. कर्णधार मयंक अगरवालने ३२ धावा केल्या आणि शिखर धवनने ४३ धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ७१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर भानुका राजपक्षेने ४३ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांमध्ये पंजाबला कमी चेंडूत जास्त धावा करायच्या होत्या, तेव्हा खेळपट्टीवर आला ओडियन स्मिथ. ओडियन स्मिथने अवघ्या ८ चेंडूत २५ धावा ठोकल्या आणि विजयात महत्वाची भूमिका बजावली. शाहरुख खानेने २४ धावा केल्या आणि स्मिथसोबत तो खेळपट्टीवर नाबाद राहिला.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!