जगभरातील सर्वांची आवडती आणि मोठी असलेली टी२० लीग इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामात १० संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे आता किताब जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आयपीएलने अनेक खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली आहे. त्यामुळे खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघातही आपले स्थान मिळवले आहे. मात्र, काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना आयपीएल २०२०मधील खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघातून बाहेर पडावे लागले आहे. अशातच, भारतीय संघाच्या स्टार खेळाडूला आयपीएलमध्ये संधी मिळू न शकल्याने त्याची कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे असे तर्क लावले जात आहेत की, तो लवकरच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो.
क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो हा गोलंदाज
खरं तर, मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) खेळणारा भारतीय संघाचा धाकड फलंदाज इशांत शर्माची (Ishant Sharma) कारकीर्द धोक्यात आहे. एकेकाळी इशांत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागातील सर्वोत्तम गोलंदाज होता. मात्र, त्याला खराब प्रदर्शनामुळे संघातील स्थान कायम ठेवण्यात अपयश येत आहे. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माही इशांतला संघात स्थान देण्याबाबत विचार करत नाहीये.