---Advertisement---

‘आयपीएल २०२३मध्ये विराट होऊ शकतो…’, अनुभवी फिरकीपटू अश्विनचे हैराण करणारे वक्तव्य

On: बुधवार, मार्च 23, 2022 11:29 PM
Virat-Kohli
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरू होत आहे. यावर्षी हंगामात १० संघ खेळणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आगामी हंगामात नवीन कर्णधारासह खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. संघाचा नवा कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसची निवड करण्यात आली आहे, त्यामुळे संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ९ वर्षांनंतर आयपीएलमध्ये एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. आयपीएलमध्ये फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू विराट कोहली याने २०१३ ते २०२१ पर्यंत पूर्णवेळ आरसीबीचे नेतृत्व केले.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून आरसीबीला ट्रॉफी जिंकून दिली नसली, तरी कोहली ९ वर्ष कर्णधार म्हणून कायम राहिला. भारतीय संघाचे टी२० कर्णधारपद सोडल्यानंतर काही दिवसांनी, विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले आणि आयपीएल २०२१च्या शेवटच्या काही सामन्यामध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याने कसोटी कर्णधारपदही सोडले आणि एकदिवसीय क्रिकेटमधूनही त्याला वगळण्यात आले. सध्या भारतीय संघात विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळतो आणि आयपीएलमध्ये तो कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वाखाली खेळेल.

आरसीबीच्या कर्णधारपदावर मत मांडत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) म्हणाला की, “हा आरसीबीचा एक चांगला निर्णय आहे, परंतु पुढील वर्षी विराट कर्णधार म्हणून परत येऊ शकतो.” अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की, “फाफ सध्या त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याला अजून दोन-तीन वर्षे उरली पाहिजेत, आणि आरसीबीने त्याला कर्णधार बनवले आहे, जो खूप चांगला निर्णय आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि खरं तर, त्याने स्वतःच सांगितले आहे की, त्याच्या कर्णधार कौशल्यात आपण एमएस धोनीचा स्पर्श बघू शकतो.”

तो पुढे म्हणाला, “मला वाटते की, विराट कोहली कर्णधार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून खूप तणावातून गेला आहे. हे वर्ष त्याच्यासाठी ब्रेकसारखे असेल आणि ते पुढच्या वर्षी त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करू शकतात. होय, मला वाटते.”

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट अव्वलस्थानी आहे. त्याने ३७.३९च्या सरासरीने ६२८३ धावा केल्या आहेत. त्यात त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतके ठोकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या तीन नव्या नियमांचे रोहित शर्माकडून कौतुक, वाचा काय म्हणाला मुंबई इंडियन्सचा कर्णधार

‘आता आमची बारी आहे, कारण…’, मार्क वूडच्या जागी ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील झाल्यानंतर लखनऊ संघाचं ट्वीट

पंत आणि धोनीच्या तुलनेवर शेन वॉटसनची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘या’ बाबतीत दोघेही एकसारखे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---