प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने रविवारी (१५ मे) त्यांचा विजयरथ थांबू दिला नाही. सीएसकेविरुद्धच्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. प्रत्युत्तरात गुजरात्या फलंदाजांनी संघाला सोपा विजय मिळवून दिला. हा सामना पाहण्यासाठी एमएस धोनीचा एक चाहता लांबचा प्रवास करून आला होता, पण त्याची निराशाच झाली.
आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजेच एमएस धोनी (MS Dhoni). त्याच्याच नेतृत्वात सीएसकेने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. परंतु चालू हंगामात संघाचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. असे असले तरी, सीएसकेचा सामना असल्यानंतर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. चाहत्यांमध्ये सामन्यापेक्षा धोनीला पाहण्याची उत्सुकता जास्त असते.
https://twitter.com/chhikarakhush7/status/1525803685011304449?s=20&t=GpAwBUTy8nvlk6Eo3URYWA
धोनीसाठी हिच उत्सुकता गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात देखील दिसली. धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात येत होता, तेव्हा चाहते मोठमोठ्याने त्याच्या नावाचा गजर करत होते. संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी-धोनी अशी घोषणाबाजी केली जात होती. अशात सर्वाचे लक्ष वेधले, ते धोनीच्या एका चाहत्याने. त्या चाहत्याने हातात एक पोस्टर पकडला होता आणि त्यावर लिहिले होते की, “मी १४०० किलोमीटरवरून फक्त धोनीला पाहण्यासाठी आलो आहे.” तर दुसरा एक चाहता होता, ज्याच्या पोस्टवर लिहिले होते की, “तीन जनरेशन्स – मी, माझा मुलगा आणि माझा नातू धोनीला पाहण्यासाठी आलो आहोत.”
Thala Entry 💥😎 #CSKvsGT pic.twitter.com/QzZSjYTWG1
— Vɪᴊᴀʏ (@na_Vijay12) May 15, 2022
असे असले तरी, धोनी मात्र या चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. त्याने १० चेंडू खेळले आणि अवघ्या ७ धावा करून बाद झाला. दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ५ विकेट्सच्या नुकसानावर १३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने हे लक्ष्य ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.१ षटकात गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऋतुराजने दाखवला धोनीच्या फेमस ‘हेलिकॉप्टर शॉट’चा नवा व्हर्जन, प्रभावी शॉटचा Video पाहा
टूक टूक अकादमीचे अध्यक्ष..! गुजरातविरुद्ध अर्धशतक करूनही ट्रोल झाला ऋतुराज, जाणून घ्या कारण
दिवंगत क्रिकेटर सायमंड्सला चेन्नई आणि गुजरातच्या खेळाडूंनी ‘अशी’ वाहिली श्रद्धांजली